कोविड-19 महामारीमुळे (COVID-19 Pandemic) यंदाचा राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार (National Sports Awards) सोहळा एक किंवा दोन महिन्यापर्यंत उशीर होण्याची शक्यता असल्याचे क्रीडा मंत्रालयाच्या (Sports Ministry) अधिकाऱ्याने सांगितले. मात्र, या संदर्भातील अंतिम निर्णय राष्ट्रपती भवनातून (Rashtrpati Bhavan) मार्गदर्शन आल्यानंतरच घेण्यात येईल. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांमध्ये राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार आणि ध्यानचंद पुरस्कार यांचा समावेश आहे. दरवर्षी राष्ट्रपती भवनात 29 ऑगस्ट रोजी हा पुरस्कार देण्यात येतो. इतिहासातील एक महान हॉकी मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवशी या पुरस्कारांचे वितरण होते. परंतु यावर्षी, महामारीमुळे या पुरस्कार वितरण सोहळ्याला विलंब होण्याची शक्यता असली तरीही क्रीडा मंत्रालयाला अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आहे. “राष्ट्रपती भवनातून आम्हाला अद्याप काहीही कळले नाही. आम्ही क्रीडा पुरस्कारांच्या संदर्भात संप्रेषणाची प्रतीक्षा करीत आहोत. मात्र, या क्षणी काय होईल हे सांगणे फार कठीण आहे," मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने PTIला सांगितले. “कोविड-19 कारणास्तव सध्या देशभरात सार्वजनिक मेळावे प्रतिबंधित आहे म्हणून राष्ट्रपती भवनात कोणतेही कार्यक्रम आयोजित केले जात नाहीत." (BCCI कडून खेलरत्न पुरस्कारासाठी रोहित शर्माची शिफारस; तर, अर्जुन पुरस्कारासाठी शिखर धवन, इशांत शर्मा, दिप्ती शर्मा यांचे नामांकन)
"पूर्वी देखील, पुरस्कार सोहळा विलंबाने आयोजित केला गेला होता, म्हणून जर 29 ऑगस्ट रोजी हा कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकत नसेल तर आम्ही एक किंवा दोन महिन्यांनंतर ते ठेवू शकतो. सध्या सर्वांचे कल्याण आणि सुरक्षितला प्राधान्य आहे," ते पुढे म्हणाले. महामारीने गेल्या महिन्यात क्रीडा मंत्रालयाला पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत वाढविणे भाग पाडले होते. लॉकडाऊनमध्ये सल्लागार शोधण्यासाठी त्यांना ज्या अडचणी येत आहेत ते पाहता खेळाडूंनी त्यांना नामनिर्देशित करण्याची परवानगी दिली होती.
या नामनिर्देशनातून अर्जदाराची संख्या बरीच वाढली परंतु क्रीडा मंत्रालयाने या स्पर्धेच्या आयोजनास अवघा महिनाभर राहिला असताना अंतिम विजेते निवडण्यासाठी समिती नेमलेली नाही. मंत्रालयाने अद्याप अर्जांचे स्क्रिनिंग सुरू केले नसून विलंब होणे अनिवार्य आहे, अशी माहिती मिळाली आहे. मंत्रालयाच्या एका सूत्रांनी सांगितले की, "यावर्षी क्रीडा पुरस्कार निश्चितपणे उशीर होणार आहे कारण अर्जांची तपासणी करण्याचे काम अद्याप सुरु झाले नाही. पण पुरस्कार नक्कीच दिले जातील. पात्र खेळाडू आणि प्रशिक्षकांना त्यांची योग्य मान्यता नाकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही."