रेल्वे अपघातात सुदैवाने बचावलेली तरुणी द्रविता सिंग येणाऱ्या मुंबई मॅरेथॉनमध्ये धावण्यासाठी सज्ज झाली आहे. फटका गँगने शिकार केलेली द्रविता जवळपास 10 महिन्यानंतर पुन्हा स्वत:च्या पायावर उभी राहू शकणार आहे.
छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकमधून 7 फेब्रुवारी 2017 रोजी द्रविता लोकलने प्रवास करत होती. त्यावेळी फटका गँगने तिच्या हातावर जोरात फटका मारत तिचा मोबाईल खेचून घेतलाय त्यानंतर द्रविताच्या हातावर मारल्याने ती खाली रेल्वेरुळांवर पडली. या अपघातात तिला एक हात आणि पाय गमवावा लागला होता. तसेच द्रवितावर सहा जटिल शस्रक्रिया करण्यात आल्या. परंतु द्रविताने खचून न जाता नव्या आशेने पुढील आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला आहे.
तर येत्या 20 जानेवारी 2019 रोजी मुंबई मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.त्यामुळे जुन्या आठवणी विसरुन आता द्रविता पायावर उभी राहणार असल्याने मॅरेथॉनमध्ये धावताना दिसून येणार आहेत. तसेच द्रविताच्या डॉक्टरांनी त्यांच्यासह तिला मॅरेथॉनमध्ये धावण्याचा संकल्प केला आहे.