हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि केएल राहुल (KL Rahul) मैदानावर व त्याबाहेर चांगले मित्र आहेत. दोघांच्या मैत्रीचे किस्से आपण अनेकदा ऐकले आहेत. वादग्रस्त परिस्थितीचा सामना करूनही दोंघांमधील मैत्री अतूट आहे. 30 जुलै रोजी हार्दिक आणि पत्नी नताशा स्टेनकोविच (Natasa Stankovic) यांना पुत्ररत्न प्राप्त झाले. भारतीय ऑल-राउंडरने सोशल मीडियावर माहिती शेअर करून आनंद व्यक्त केला. हार्दिकचा भाऊ क्रुणाल पांड्याने (Krunal Pandya) हार्दिकच्या मुलाचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आणि ‘चल क्रिकेटवर चर्चा करूया’ असे कॅप्शन दिले. राहुलने या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आणि लिहिले की, “कृपया त्याला वेगवान गोलंदाज-अष्टपैलू होण्यासाठी सांगा”. हा व्हिडिओ पाहून अनेक चाहत्यांनी क्रुणालला वेगवेगळी मतं दिली. एखाद्याने मुलास अष्टपैलू होण्यासाठी सांगितले तर कोणी गोलंदाजी करण्यास म्हटले. पण, राहुलने त्याला आपल्या वडिलांसारखे वेगवान गोलंदाज अष्टपैलू बनण्यास सांगितले. (हार्दिक पांड्या आणि पत्नी नताशा स्टेनकोविचच्या बेबी बॉयच्या नावाचा झाला खुलासा, पाहा कोणत्या नावाने ओळखला जाणार ज्यूनिअर पांड्या See Pic)
हार्दिक आणि पत्नी नताशाने यंदा नवीन वर्षा दरम्यान आपला साखरपुडा जाहीर केला होता आणि लॉकडाऊन दरम्यान दोघेही लग्नबंधनात अडकले. 2016 मध्ये पदार्पण केल्यापासून हार्दिक हा भारतीय मर्यादित ओव्हरच्या संघात नियमित खेळाडू होता. वेगवान गोलंदाजीची अष्टपैलू कामगिरी त्याने पार पाडली आहे आणि सध्या त्याच्या फलंदाजी व गोलंदाजीचे कौशल्य सुधारले आहे. राहुल आणि हार्दिक दोघे चांगले मित्र आहे, पण लवकरच दोघेही इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) एकमेकांच्या विरोधात खेळताना दिसतील. हार्दिक आणि भाऊ क्रुणाल हे मुंबई इंडियन्स संघाचे महत्त्वपूर्ण सदस्य आहे राहुल पहिल्यांदा किंग्ज इलेव्हन पंजाबचे कर्णधार म्हणून नेतृत्व करण्यास सज्ज आहे.
पाहा कृणालचा व्हिडिओ:
केएल राहुलचा सल्ला...
राहुल आणि हार्दिक प्रत्येक कठीण काळात राहिले आहेत. हार्दिकमुळे करण जोहरच्या शो 'कॉफी विथ करण' या शो मधेही दोघे वादात सापडले होते. या शोमध्ये हार्दिकने मुलींविषयी आक्षेपार्य कमेंट्स केल्या होत्या ज्यानंतर बीसीसीआयने दोन्ही खेळाडूंना काही काळ बंदी घातली होती आणि मागील वर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून त्यांना मायदेशी पाठवण्यात आले होते. हार्दिकच्या टिप्पणीने भारतीय क्रिकेटची प्रतिमा ढासळली असल्याचे बीसीसीआय मत होते. यानंतर दोन्ही खेळाडूंनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर माफी मागितली. मात्र, या वादानंतरही राहुल आणि हार्दिकच्या मैत्रीत कोणताही फरक पडला नाही.