Hardik Pandya's Son Name: हार्दिक पांड्या आणि पत्नी नताशा स्टेनकोविचच्या बेबी बॉयच्या नावाचा झाला खुलासा, पाहा कोणत्या नावाने ओळखला जाणार ज्यूनिअर पांड्या (See Pic)
हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक (Photo Credit: Instagram)

भारताचा ऑल राऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोविकच्या (Natasa Stankovic) घरात नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. 30 जून रोजी हार्दिकने आपल्या लेकाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांसोबत गोड बातमी शेअर करून आनंद साजरा केला. हार्दिकने आपल्या बाळाचा पहिला फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला होता. आणि आता हार्दिकचा लेक आणि नताशा घरी आले आहे, यावेळी पांड्या-कुटुंबीयांनी माय-लेकाचे जोरदार स्वागत केले. हार्दिक आणि नताशा सोबत त्याच्या मुलाची अनेक छायाचित्रे सोशल मीडियावर समोर आली. इतकेच नाही तर हार्दिकचा मोठा भाऊ कुणाल पांड्या (Krunal Pandya) यानेही ज्युनियर पांड्याबरोबर फोटो शेअर केला आणि 'बडे पापा' बनल्याचा आनंद व्यक्त केला. दरम्यान, हार्दिकने अद्याप आपल्या मुलाने नाव अधिकृतपणे जाहीर केलेले नाही आहे. मात्र, नताशा व बाळाच्या स्वागतासाठी आणण्यात आलेल्या केकवर बाळाचे नाव लिहिण्यात आले होते ज्याने बाळाचे नाव उघड केले. (हार्दिक पांड्या ने शेअर केला लेकासोबत 'हा' खास फोटो; फॅन्सने केलं ज्युनिअर पांड्याचं स्वागत)

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये केकच्या नावावर झूम केल्याने हार्दिकच्या मुलाचे नाव 'अगस्त्य' असल्याचे दिसून येत आहे. या दोघांनी नवीन वर्षात रोमँटिक शैलीत साखरपुडा केला आणि या लॉकडाऊन दरम्यान लग्न बंधनात अडकले. याच दरम्यान हार्दिकने चाहत्यांना बाबा होणार असल्याची गोड बातमी दिली.

पाहा केकचा हा फोटो:

हार्दिकने मुलाच्या जन्माची बातमी सोशल मीडियावर सांगितली आणि आपल्या बाळाचा पहिला फोटो शेअर केला. हार्दिक-नताशा आयुष्याच्या या नव्या प्रवासातील प्रत्येक क्षण अनुभवत होते. यापूर्वी नताशा आणि हार्दिकने बेबी बंपसह आपलं फोटोशूटही केलं होतं व सोशल मीडियावर शेअर केले. हातात हात धरून रोमँटिक पोझ देत दोघांनीही फोटो काढले. हार्दिक-नताशाचे मॅटर्निटी फोटोशूट सोशल मीडियावर चांगले व्हायरल झाले होते.