Hardik Pandya Son New Pic: हार्दिक पांड्या ने शेअर केला लेकासोबत 'हा' खास फोटो; फॅन्सने केलं ज्युनिअर पांड्याचं स्वागत
Hardik Pandya Instagram Post (Photo Credits: Instagram)

टीम इंडियाचा ऑल राउंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याच्या घरी नुकतंच एका चिमुकल्याचं आगमन झालं आहे. हार्दिकची पत्नी नताशा स्टॅनकोविच (Natasha Stankovic) हिने बाळाला जन्म दिला आहे. बाळाचा फोटो शेअर करून हार्दिकने फॅन्सना ही गुड न्यूज दिली होती, मात्र फोटोमध्ये बाळाचा केवळ हात दाखवला होता तर आता त्याने आपल्या लेकासोबत एक खास फोटो शेअर करून ज्युनिअर पांड्याची पहिली झलक शेअर केली आहे. हार्दिकने हॉस्पिटल मध्ये बाळाचा जन्म होताच त्याला हातात घेऊन काढलेला हा फोटो पाहून त्याचे चाहते खुश झाले आहेत, सर्वांनी ज्युनिअर पांड्याला वेलकम करत नताशा आणि हार्दिकवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. (हार्दिक पांड्या आणि नताशा स्टेनकोविचचे 'हे' रोमँटिक मॅटर्निटी फोटोशूट पाहून तुम्हीही पडाल त्यांच्या प्रेमात, पाहा Photos)

हार्दिकने सर्वांना आश्चर्याचा धक्का देत 31 मे ला नताशा प्रेग्नन्ट असल्याचं जाहीर केलं. लॉकडाऊन दरम्यान दोघांनी लग्न केले आणि 1 जानेवारी रोजी हार्दिकने नताशाशी गुपचूप साखरपुडा करुन सर्वांना आधीच चकित केले होते. तर आता 30 जुलै ला त्याने आपण बाबा झाल्याचे सुद्धा जाहीर केलं. हे बाळ आपल्यासाठी देवाचा आशीर्वाद असल्याचे म्हणत हार्दिक ने या सुंदर फोटोला कॅप्शन दिलं आहे.

हार्दिक पांड्या Instagram Post

 

View this post on Instagram

 

The blessing from God 🙏🏾❤️ @natasastankovic__

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on

दरम्यान, हार्दिकच्या लग्नापासून ते आता या पाहुण्याबाबत सर्व काही फॅन्ससाठी आश्चर्याचा धक्का होते. पण प्रत्येकवेळी फॅन्सने हार्दिकला आपल्या शुभेच्छा देत आनंदात सहभाग घेतला आहे. हार्दिकने सुद्धा नताशा च्या मॅटर्निटी शूट पासून ते अगदी डिलिव्हरीला जात असताना पर्यंतचे सर्व क्षण फॅन्ससोबत शेअर केले आहेत.