भारत- वेस्ट इंडिज सामन्यांचं वेळपत्रक ! कुठे, कधी रंगणार सामना ?

यंदा ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यात दसरा आणि दिवाळीच्या सणाची धामधूम आहे. या सणवारांसोबतच क्रीडाप्रेमींसाठी आणि प्रामुख्याने क्रिकेटवेड्यांसाठी भारत- वेस्ट इंडिजदरम्यान मालिकांची धूम आहे. या काळात दोन सामन्यांतही कसोटी मालिका होणार आहे. पहिला राजकोट आणि दुसरा सामना हैदराबादमध्ये रंगणार आहे. नुक़तेच बीसीसीआयने भारत- वेस्ट इंडिज क्रिकेट सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यामध्ये दोन कसोटी, पाच एकदिवसीय आणि आणि तीन टी-२० सामने आहेत.

कसोटी सामने कुठे आणि कधी ?

४ ते ८ ऑक्टोबर दरम्यान राजकोटमध्ये तर १२ ते १६ ऑक्टोबर दरम्यान हैदराबाद मध्ये कसोटी सामने रंगतील.

एकदिवसीय सामने कुठे आणि कधी ?

२१ ऑक्टोबर - गुवाहाटी

२४ ऑक्टोबर - इंदुर

२७ ऑक्टोबर - पुणे

२९ ऑक्टोबर - मुंबई

५ नोव्हेंबर - तिरुवनंतपुरम

टी-२० सामने कुठे आणि कधी ?

४ नोव्हेंबर - कोलकाता

६ नोव्हेंबर - लखनऊ

११ नोव्हेंबर - चेन्नई

लखनऊमध्ये रंगणार पहिला आंतरराष्ट्रीय सामना  

नवाबांचं शहर म्हणून ओळख असलेल्या लखनऊमध्ये पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय सामना रंगणार आहे.  इकाना अंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये हा सामना रंगेल. हा सामना दिवाळीच्या एक दिवस म्हणजे 6 नोव्हेंबरला रंगणार आहे.  दिवाळीच्या पूर्वसंध्येला हा सामना रंगणार असल्याने  क्रिकेट चाहत्यांमध्ये, क्रिकेट सेलिब्रिटींमध्ये कमालीची उत्सुकता आहे.