IND vs PAK, ICC World Cup 2019: भारत-पाकिस्तान सामन्यावर हि बरसणार वरुण देव? 'हा' आहे हवामान खात्याचा अंदाज
(Photo Credit: PTI)

गेल्या काही दिवसापासून इंग्लंड (England) मध्ये पडत असलेल्या पावसामुळे विश्वकप मधले ४ सामने आत्तापर्यंत रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे खेळाडूंसह चाहत्यांची पण मोठी निराशा झाली. गुरुवारी भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील सामनाही आता रद्द झाल्यामुळं चाहते आयसीसी (ICC) वर संतापले आहेत. त्यामुळे जर भारत-पाकिस्तान (Pakistan) सामन्याला सुद्धा पावसाचा फटका बसला तर, चाहते चांगलेच निराश होणार आहेत. (World Cup 2019: तुम्हाला जमणार नाही हे! IND vs NZ सामना लांबणीवर गेल्याने चाहत्यांनी उडवली ICC ची खिल्ली)

दरम्यान, हवामान खात्याच्या अंदाजानुसार मॅन्चेस्टर (Manchester) मध्ये  सकाळपासून-संध्याकाळपर्यंत पाऊस पडण्याची 50% शक्यता आहे. मॅन्चेस्टरमध्ये सकाळी 9, 11 असं दिवसभरात तीनवेळा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

यंदाच्या विश्वकप मध्ये जास्तीत जास्त सामने रद्द करण्याची नोंद करण्यात आली आहे. पहिला सामना 7 जून रोजी पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात रद्द झाला होता. त्यानंतर दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यातला सामना रद्द झाला, हा सामना केवळ 7.3 ओव्हर खेळला गेला होता. त्यानंतर श्रीलंका-बांगलादेश यांच्यातला सामना रद्द झाला होता.

यंदा इंग्लंडमध्ये जून महिन्यात सर्वात जास्त पाऊस हा मॅन्चेस्टर शहरात पडला आहे. त्यामुळं या सामन्याला पावसाचा फटका बसणार असे चित्र दिसत आहे. सतत रद्द होत असलेल्या सामन्यांमुळे चाहत्यांकडून आयसीसीवर टीका होत आहे. पावसामुळे सामने रद्द होत असल्यास राखीव दिवस का ठेवण्यात आले नाही, असा हि प्रश्न चाहते विचारत आहेत.