IND vs PAK, ICC World Cup 2019: रोहित शर्मा आणि विराट कोहलीची धमाकेदार खेळी, भारताचं पाकसमोर 337 धावांचं आव्हान

रोहित शर्मा (Rohit Sharma) चे शतक, के एल राहुल (KL Rahul) चे अर्ध-शतक आणि कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) च्या 77 धावांच्या जोरावर भारताने पाकिस्तान (Pakistan) समोर सामना जिंकण्यासाठी 337 धावांचे मोठे आव्हान ठेवले आहे. पहिले टॉस जिंकून पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमद (Sarfraz Ahmed) ने भारताला फलंदाजी करायचं आमंत्रण दिले. त्यानंतर भारताच्या सलामी जोडीने, रोहित शर्मा आणि के एल राहुलने पहिल्या विकेटसाठी 136 धावा जोडल्या.(IND vs PAK, CWC 2019 : रोहित शर्माने मारलेल्या Six ने प्रेक्षकांना झाली सचिनची आठवण (Video))

वाहब रियाझने पाकिस्तानला पहिले यश मिळवून दिले. त्यानं लोकेश राहुलला बाद केले. राहुलने 78 चेंडूंत 3 चौकार व 2 षटकारांसह 57 धावा केल्या. पाकिस्तानसाठी मोहम्मद आमिरने 10 ओव्हरमध्ये 44 धावा देऊन 3 विकेट्स काढल्या. दरम्यान, रोहितने ८५ बॉलमध्ये धमाकेदार शतक झळकावलं. रोहित शर्माने 113 बॉलमध्ये 140 रनची खेळी केली. रोहितच्या या खेळीमध्ये 14 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता.

भारताने विश्वचषकात दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांना हरवून झोकात सुरुवात केली आहे. भारताचा न्यूझीलंड (New Zealand) विरुद्धचा तिसरा सामना पावसाने रद्द झाला. दुसरीकडे पाकिस्तानने विश्वचषकात चार सामने खेळले आहेत. त्यापैकी केवळ एका सामन्यात विजय झाला आहे तर दोन सामन्यात पराभव झाला. एक सामना रद्द झाला.