IND vs PAK, CWC 2019 : रोहित शर्माने मारलेल्या Six ने प्रेक्षकांना झाली सचिनची आठवण (Video)
(Image Source: @RoUniverse4/Twitter)

2003 विश्वकपमध्ये सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) ने शोएब अख्तर (Shoaib Akhtar) ला मारलेला तो सिक्सर आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. याच मॅचमध्ये विरेंद्र सेहवागनेही (Virender Sehwag) याच पद्धतीने सिक्स लगावली होती. मात्र, रोहित शर्मा (Rohit Sharma) ने पाकिस्तान (Pakistan) विरुद्धच्या मॅचमध्ये असाच एक शॉट मारला आणि प्रेक्षकांना सचिन ने मारलेल्या त्या सिक्सची आठवण काठल्या शिवाय राहवले नाही.  (IND vs PAK, ICC World Cup 2019: एल एस धोनीला मागे टाकत रोहित शर्मा बनला Sixer किंग)

73 बॉलमध्ये 85 रनवर असताना रोहितने पाकिस्तानच्या हसन अलीला सिक्स मारला. या सिक्ससह रोहित शर्मा नव्वदीमध्ये पोहोचला.

रोहितचं वनडे क्रिकेटमधलं हे २४वं शतक होतं. सर्वाधिक शतक करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर आहे. शिवाय रोहितचं या विश्वकपमधलं हे दुसरं शतक आहे. याआधी दक्षिण आफ्रिके (South Africa) विरुद्धच्या मॅचमध्येही शतक केलं होतं. तर ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्धच्या मॅचमध्ये रोहितने अर्धशतकी खेळी केली होती.