T20 World Cup 2021: टी-20 विश्वचषकात 'हे' 4 संघ सेमीफायनलमध्ये करतील प्रवेश, गौतम गंभीर यांची भविष्यवाणी
Gautam Gambhir | (Photo Credits: IANS)

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आगामी टी-20 विश्वचषकाचे ( T20 World Cup 2021) वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार, येत्या ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात ही स्पर्धा रंगणार आहे. यासाठी प्रत्येक संघ तयारीला लागले आहे. या विश्वचषकाबद्दल क्रिकेट चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली आहे. याचदरम्यान, भारताचे माजी खेळाडू गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी या स्पर्धेबाबत मोठा अंदाज वर्तवला आहे. या विश्वचषकात कोणते 4 संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे? याबाबतही त्यांनी भाष्य केले आहे.

गौतम गंभीर म्हणाले की, यावर्षीच्या टी-20 स्पर्धेत भारत, न्यूझीलंड, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज हे 4 संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. तर, भारतीय संघाला यावेळी टी-20 विश्वचषकाचे प्रवळ दावेदार मानले जात आहे. कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीस बुमराह भारतीय संघासाठी मोठी कामगिरी करण्याची शक्यता आहे. जसप्रीस बुमराहचा फॉर्म चांगला राहिला तर, भारत जेतेपदाचा प्रबळ दावेदार असेल. यूएईच्या खेळपट्ट्यांवर फिरकी गोलंदाजांना अधिक मदत मिळते. भारतासाठी ही एक मोठी संधी आहे. भारताकडे चांगले फिरकीपटू आहेत. तसेच भारताकडे फिरकी गोलंदाजीवर खेळणारे फलंदाज देखील आहे. हे देखील वाचा- Sri Lanka Cricket Contract: श्रीलंकन खेळाडूंच्या कराराच्या यादीतून ‘या’ स्टार अष्टपैलूला डच्चू, बंदी घातलेल्या खेळाडूंनाही नाही मिळाले स्थान

गौतम गंभीरने 58 कसोटी, 147 एकदिवसीय आणि 37 टी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. गंभीरने कसोटीत 4154 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर वनडेमध्ये 5238 धावा केल्या. याशिवाय या डावखुऱ्या फलंदाजाने टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 932 धावा केल्या.