अँजेलो मॅथ्यूज (Photo Credit: Instagram)

अष्टपैलू अँजेलो मॅथ्यूज (Angelo Mathews) आणि निलंबित तीन खेळाडूंसह-दनुष्का गुणाथिलाका, निरोशन डिकवेला आणि कुसल मेंडिस यांचा शुक्रवारी श्रीलंका क्रिकेटच्या (Sri Lanka Cricket) 18 खेळाडूंच्या राष्ट्रीय कराराच्या यादीत समावेश नाही करण्यात आल्याची श्रीलंका क्रिकेटने घोषणा केली. कराराचा कालावधी पाच महिन म्हणजेच 31 डिसेंबर 2021 पर्यंत असेल. एसएलसीने (SLC) स्पष्ट केले की मॅथ्यूज करारबद्ध खेळाडूंच्या यादीत नाही आहे कारण तो “सध्या निवडीसाठी उपलब्ध नाही”. “अँजेलो मॅथ्यूज, ज्याला करार देण्यात आला होता त्याचा विचार केला गेला नाही, कारण तो सध्या निवडीसाठी अनुपलब्ध आहे. तर दनुष्का गुणाथिलाका (Danushka Gunathilaka), निरोशन डिकवेला (Niroshan Dickwella) आणि कुसल मेंडिस (Kusal Mendis) यांच्यावर सध्या बंदी घातली गेली आहे. इसरु उदाना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे,” एसएलसीने म्हटले.

करारावर, मंडळाने एक निवेदन देत म्हटले की, “खेळाडूंनी यापूर्वी दिलेल्या करारांमध्ये कोणतेही विचलन न करता करारांवर स्वाक्षरी केली, जी श्रीलंका क्रिकेटने तांत्रिक सल्लागार समितीसह तयार केली होती. कामगिरी, फिटनेस, नेतृत्व/ज्येष्ठता, व्यावसायिकता/आचारसंहिता, आणि भविष्य/अनुकूलता यासारख्या निकषांच्या आधारावर खेळाडूंना चार श्रेणींमध्ये निवडले आणि निवड पॅनेलद्वारे नामांकित करण्यात आले. निकष आणि गुणांचे वाटप. करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी वैयक्तिक खेळाडूंना खेळाडूंमध्ये सामायिक केले गेले.” दरम्यान मेंडिस, यष्टीरक्षक डिकवेला आणि गुणाथिलाका यांना इंग्लंडमधून डरहम येथील बायो-बबल प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्या प्रकरणी दोषी आढळल्यानंतर घरी पाठवण्यात आले होते. या करारासंदर्भात बरेच मतभेद होते. त्यानंतर श्रीलंकेच्या खेळाडूंनी इंग्लंड व भारताविरुद्ध मालिकेसाठी तात्पुरत्या व्यवस्थेनुसार करार केले होते. ज्या खेळाडूंना करारबद्ध केले आहे त्यांमध्ये धनंजय डी सिल्वा, कुसल परेरा, दासून शनका, वानिंदु हसरंगा, दिनेश चंडीमल अशा मुख्य खेळाडूंचा समावेश आहे.

राष्ट्रीय करार देण्यात आलेले खेळाडूंची यादी: धनंजय डी सिल्वा, कुसल परेरा, दिमुथ करुणारत्ने, सुरंगा लकमल, दासुन शनाका, वनिंदू हसरंगा, लसिथ एम्बुल्डेनिया, पथुम निसांका, लाहिरू थिरिमन्ने, दुश्मंत चमीरा, दिनेश चंडीमल, लक्ष्मण सांदाकन, विश्वा फर्नांडो, ओशाडा फर्नांडो बंडारा आणि अकिला दानंजया.