PAK vs BAN: World Cup 2019 च्या सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी पाकिस्तान याला 'हे' करावे लागणार आहे, जाणून घ्या काय आहे गणित
(Photo Credit: Getty Image)

आयसीसी (ICC) विश्वकपच्या बुधवारी झालेल्या सामन्यात यजमान इंग्लड (England) ने न्यूझीलंड (New Zealand) संघाचा 119 धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह इंग्लंडच्या खात्यात 9 सामन्यात 12 गन आहे तो गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. इंग्लंडच्या न्यूझीलंडविरुद्ध विजयाने पाकिस्तान (Pakistan) चे सेमीफायनलमध्ये पोहचण्याचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे असं म्हणणे चुकीचे नाही. कारण बांगलादेश विरुद्ध एक चमटकाराचं पाकिस्तानी संघाला सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळू शकतो. हा चमत्कार करणे तसे खूप कठीण आहे. (ICC World Cup 2019: आईसीसी वर्ल्डकप चक्क 1.5 सेंटीमीटरचा, सोनाराची कमाल Photo)

पाकिस्तान आणि बांगलादेश (Bangladesh) यांच्यात शुक्रवारी इंग्लंडच्या लॉर्ड्स (Lords) मैदानवर सामना होणार आहे. या सामन्यात पाकचा कर्णधार सरफराज अहमद (Sarfraz Ahmed) ने नाणेफेक हारली आणि बांगलादेशने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तर पाकिस्तान स्पर्धेबाहेर पडेल. पण जर सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी केली आणि त्यांनी 350 धावा केल्या. अशा परिस्थितीत पाकिस्तानी गोलंदाजांनी बांगलादेशी फलंदाजांना 38 धावसंख्यावर ऑल आऊट करावे लागेल. जर पाकिस्तानने 400 धावा केल्या तर बांगलादेशचा डाव 84 धावांवर संपुष्ठात आणावा लागले. तरच त्यांचा रनरेट न्यूझीलंडपेक्षा जास्त होऊ शकतो.

दरम्यान, यंदाच्या विश्वकपमध्ये सेमीफायनलचे संघ जवळपास निश्चित झाले आहेत. प्रथम क्रमांक मिळवला आहे ऑस्ट्रेलिया (Australia). त्यानंतर बांगलादेशचा पराभव करत टीम इंडिया (Team India) ने अंतिम चारमध्ये स्थान पक्क केले. मग इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव करत सेमीफायनमध्ये तिसरे स्थान मिळवले. न्यूझीलंड संघाचे सेमीफायनलचे तिकिट जवळ जवळ निश्चित आहे. मात्र, पाकिस्तानने बांगलादेशविरुद्ध सामन्यात काही चमत्कार केला तर न्यूझीलंड स्पर्धेबाहेर पडले.