Miniature of World Cup Trophy (Photo Credits-ANI)

आईसीसी वर्ल्डकपचे (ICC World Cup 2019) सामने आता अंतिम टप्प्याच्या नजीक येऊन पोहचले आहेत. त्यामुळे क्रिकेट प्रेमींमध्ये सामने पाहण्याचा उत्साह अधिकाधिक वाढत चालला आहे. यंदा वर्ल्डकपमध्ये भारताचा संघ (Indian Team) दमदार कामगिरी करताना दिसून येत आहे.

तर टीम इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी चाहत्यांकडून विविध शक्कल लढवली जात आहे. तर अशाच एका बंगळूरु येथील सोनार रेवणकर असे त्याचे नाव आहे. नागराज याने चक्क 1.5 सेंटीमीटर एवढी वर्ल्डकपसाठी देण्यात येणाऱ्या ट्रॉफीची प्रतिकृती बनवली आहे. या ट्रॉफिची खासियत म्हणजे त्याचे वजन 0.49 ग्रॅम आहे.(ICC World Cup 2019: 87 वर्षीय चारुलता पटेल वर उद्योगपती आनंद महिंद्रा मेहरबान, टीम इंडिया च्या उर्वरित मॅचसाठी दिली ही विशेष ऑफर)

तर सोनाराच्या या कमालीमुळे सर्वजण आता त्याच्या दुकानात ही ट्रॉफी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. तसेच सोशल मीडियात याचे फोटो प्रचंड व्हायरल होत असून नेटकरी आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.