कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) च्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने बांग्लादेश (Bangladesh) ला पराभूत करून विश्वकपच्या सेमीफाइनलमध्ये धडक मारली आहे. या मॅचदरम्यान 87 वर्षीय चारुलता पटेल (Charulata Patel) यांनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. या आज्जीबाईंनी सामन्यात फुल टू धमाल धमाल करताना दिसत होती. या आज्जीबाईंनी जी सामन्यात धमाल केली, तेवढा आनंद कुणालाही लुटता आला नाही. यांचा उत्साह आणि आनंद पाहून स्टेडियम मधील चाहते, खेळाडू काई तर टीव्ही वर सामना पाहणारे देखील अगदी भारावून गेले. (ICC World Cup 2019: IND vs BAN मॅचमध्ये आपल्या गोलंदाजीने छाप सोडलेल्या जसप्रीत बुमराह ने उघडकीस केला आपल्या अचूक यॉर्करचे गुपित, पहा Video)

दरम्यान, या आज्जीबाईंना बघून उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) देखील खूप खुश झाले आणि त्यांनी विश्वकपमधील भारताचे उर्वरित सामने बघण्यासाठी फ्री तिकीट देण्याची ऑफर दिली. महिंद्रा यांनी सोशल मीडियावर चारुलता यांची वायरल फोटो आणि व्हिडिओज पाहिल्यानंतर ट्विटरवर ऑफर दिली. महिंद्रा यांनी लिहिले, "शाब्बास इंडिया, आता याची खात्री करा की सामना जिंकून देणारी या आज्जी सेमीफायनल आणि फाइनलमध्ये देखील उपस्थित राहतील. त्यांना विनामूल्य तिकिटे द्या." यावर एका चाहत्याने म्हणटले, तुम्हीच त्यांना स्पॉन्सर का नाही करत. तेव्हा महिंद्रा यांनी त्या वर्द्ध महिलेला शोधण्याचे म्हटले आणि वचन दिले की भारताच्या पुढील सर्व सामन्यांसाठी तिकीट ते देतील.

चारुलता पटेल विषयी एक महत्वाची गोष्ट म्हणजे, 1983 मध्ये जेव्हा कपिल देव (Kapil Dev) च्या भारतीय संघाने पहिल्यादा विश्वकप जिंकला होता तेव्हा ही चारुलता आज्जी इंग्लंड (England) च्या ऐतिहासिक लॉर्ड्स (Lords) स्टेडियममध्ये उपस्थित होत्या.

दुसरीकडे, बांगलादेशविरुद्ध सामना पाहण्यासाठी चारुलता चक्का व्हीलचेअरवरून आल्या होत्या. एवढंच नाही तर कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा ने स्वत: त्यांच्या सोबत फोटो काढले.