एजबस्टन (Edgbaston) येथे झालेल्या भारत (India) विरुद्ध बांगलादेश (Bangladesh) रोमांचक सामन्यात टीम इंडिया 28 धावांनी पराभूत केले. याच बरोबर भारताने विश्वकपच्या सेमीफाइनलमध्ये दमदार प्रवेश केला आहे. टीम इंडियाने दिलेल्या 315 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशी संघ 48 षटकात सर्व विकेट गमावून 286 धावाच करू शकला. या विजयासह, भारताने आठ सामन्यात सहा सामन्यात विजय मिळवला आहे, एक सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता तर एक सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. भारताच्या खात्यात 8 सामन्यात 13 गुण आहे आणि गुणतालिकेत तो ऑस्ट्रेलिया च्या मागे दुसऱ्या स्थानावर आहे. (ICC World Cup 2019: IND vs BAN विजयानंतर विराट कोहली झाला रोहित शर्मा चा 'जबरा फॅन', म्हणाला तो सर्वोत्तम वनडे खेळाडू आहे)
भारतासाठी या सामन्यात यॉर्कर स्पेशलिस्ट जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) ने सर्वोत्तम गोलंदाजी केली. बुमराहने 10 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गेट संघाला विजयाच्या जवळ नेऊन पोहचवले. दरम्यान, सामन्यानंतर जेव्हा बुमराहला पत्रकार परिषदेत विचारले गेले की, तो नेमके कसे अचूक यॉर्कर घालतो, त्यावर त्याने काई उत्तर दिले ते ऐका.
How do you master the art of bowling yorkers 🔥🔥
Yorker King @Jaspritbumrah93 has the answers 🗣️🗣️ #TeamIndia #CWC19 pic.twitter.com/bHReXVVzbr
— BCCI (@BCCI) July 2, 2019
दरम्यान, मागील काही साम्यापासून बुमराह ने विश्वकपमध्ये प्रभावी खेळी केली आहे. बुमराह हा जगातील अव्वल क्रमांकाचा गोलंदाज आहे. भारतीय संघाच्या यशात बुमराह ने महत्वाचे योगदान दिले आहेत. आतापर्यंत बुमराह ने 56 वनडे सामने खेळले आहेत त्यात 99 बळी घेतले आहेत.