भारतीय संघाचा खेळाडू हरभजन सिंह याने ट्विटरच्या माध्यमातून पाकिस्तानी कलाकार वीना मलिक याची खल्ली उडवली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी युनायटेड नेशन जनरअसेंबली केलेल्या वक्तव्यावर हरभजन सिंहने नाराजी दर्शवत एक ट्विट केले होते. हरभजन सिंह यांच्या ट्विटला वीना मलिक यांनी प्रत्युत्तर दिले आहे. यामुळे ती सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे. सोमवारी इंम्रान खान यांचे समर्थन करत वीना मलिकने एक ट्विट केले होते. ज्यात तिने surely या शब्दाच्या जागी surly हा शब्द वापरला होता. यामुळे हरभजन सिंह याने अंग्रेजी भाषेवरून वीना मलिकची खिल्ली उडवली आहे.
युनायटेड नेशन जनरल असेंबली येथे इमराम खान यांनी केलेल्या वक्तव्यावर हरभजन सिंह यांनी नाराजी दर्शवली होती. त्यानंतर हरभजन याने ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया नोंदवली होती. दरम्यान, हरभजन म्हणाला होता की, "युनायटेड नेशन जनरल असेंबली येथील भाषणात इम्रान खान यांनी अणुबॉम्बची धमकी दिली होती. यांच्या विधानाने दोन्ही देशात अधिकच तणाव निर्माण होईल. या दरम्यान ते शांतते संदर्भात विधान करतील असे अपेक्षा होती",असे हरभजन सिंह म्हणाला होता.
हरभजन सिंह याचे ट्विट-
What do u mean by surly? Oh is it surely ?? 😂😂😂😂 lo ji dekho yeh Angreji Inki.. chill pill next time try and read before u put something in English 👍 https://t.co/dgaTOJplDU
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) October 8, 2019
यावर आपली प्रतिक्रिया देत वीना मलिकने एक ट्विट केले होते. यात तिने इंम्रान खान यांचे समर्थन करत म्हणाली की, "इम्रान खान यांनी आपल्या भाषणात शांततेचा मुद्दा उपस्थित केला होता. पंतप्रधान इम्रान खान यांनी आपल्या भाषणात शांततेबद्दल बोलले आहे. त्याने त्या भयानक दृश्याबद्दल सांगितले आहे जे कर्फ्यू हटवल्यानंतर नक्कीच दिसेल. त्यांना या गोष्टी स्पष्टपणे सांगितल्या नाहीत, तुम्हाला इंग्रजी समजत नाही का?" असे वीना मलिक म्हणाल्या होत्या. हे देखील वाचा- रोहितची उत्तुंग भरारी, तर अश्विनची टॉप १० मध्ये
वीना मलिकचे ट्वीट-
PM Imran khan DID talk about peace in his speech.He talked about the reality and the horror that will surly occur when the curfew is lifted and sadly there's gonna be a bloodbath.He clearly states that it’s not a threat but a fear
Don’t you understand English? @harbhajan_singh https://t.co/WTpjholRoT
— VEENA MALIK (@iVeenaKhan) October 7, 2019
परंतु, हरभजन सिंह याच्या इंग्रजी भाषेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या वीना मलिकची सोशलमीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले आहे. या ट्विटमध्ये वीना मलिकने surely या शब्दाच्या जागी surly असा शब्द लिहला आहे. हे हरभजन सिंह याच्या लक्षात आल्यानंतर त्याने वीना मलिक यांची फिरकी घेतली. यावर हरभजन सिंह म्हणाला की, "तुम्हाला काय म्हणायचे आहे? तुमच्या surly या शब्दाचा नेमका अर्थ काय? लो जी देखो ये अंग्रेजी इनकी.. तसेच काही लिहण्याअगोदर आधी वाचत जा",असा सल्लाही त्याने वीना मलिकला दिला आहे.