तिळगुळ घ्या, गोड गोड बोला! सचिन तेंडुलकर, अजिंक्य रहाणे यांनी चाहत्यांना दिल्या मकर संक्रांती च्या शुभेच्छा
वीरेंद्र सेहवाग पतंग उडवताना (Photo Credit: Twitter/Wikimedia Commons)

आज मकर संक्रांती (Makar Sankranti) आहे. मकर संक्रांती हा सूर्य मकर राशीत प्रवेश केल्याने त्या दिवशी साजरा केला जातो. बहुतेक वेळी हा उत्सव 14 जानेवारी रोजी येतो. परंतु यावेळी दुपारी 2.23 वाजता सूर्य 15 जानेवारीपर्यंत मकर राशीत प्रवेश केल्याने या दिवशी मकर संक्रांति साजरी केली जात आहे. आजच्याच दिवशी देशातील अन्य राज्यात बिहू, पोंगल सण देखील साजरे केले जात आहे, गुजरात मध्ये उत्तरायण (Uttarayan) साजरा केला जात आहे. नवीन वर्षातील हा पहिला सण-उत्सव आहे. देशातील राजनेत्यांपासून, अभिनेते आणि खेळाडूंनी या खास दिवसाच्या निमित्ताने चाहत्यांनाशुभेच्छा दिल्या. मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांच्यापासून आर अश्विन, वीरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) यांनी नववर्षातील पहिल्या सणाचं औचित्य साधत चाहत्यांना मकर संक्रांती, पोंगल आणि बिहू सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (Happy Makar Sankranti 2020 Images: मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठी Greetings, Wallpapers, WhatsApp Status शेअर करुन वाढवा या सणाची गोडी!)

संक्रांती, लोहडीनंतर देशभरात साजरा होणारा एक महत्त्वाचा उत्सव आहे. मकर संक्रांती उत्सव हा आध्यात्मिकदृष्ट्याही खूप महत्वाचा मानला जातो आणि यानिमित्ताने लोक अनेक प्रकारचे दान करतात. ज्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, त्या दिवशी मकर संक्रांतीचा योग्य तयार होत असल्याचे मानले जाते. जेव्हा सूर्य संक्रांत करुन मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला मकर-संक्रांती म्हणतात. संक्रांती हा हिंदू समाजाचा एक प्रमुख सण आहे. हा उत्सव देशातील बिहारमध्ये खिचडी, तामिळनाडूमध्ये पोंगल, आसाममध्ये बिहू अशा अनेक प्रकारे साजरा केला जातो.

सचिनने चाहत्यांना दिल्या मकर संक्रांंतीच्या शुभेच्छा

अजिंक्य रहाणे

वीरेंद्र सेहवाग

अश्विन

हर्षा भोगले

चेन्नई सुपर किंग्स

दरम्यान, आजच्या दिवशी गुजरातमध्ये पतंग उडवण्याची स्पर्धा केली जाते. आज गुजरातच्या आकाशामध्ये विविध आकाराच्या, रंगाचे पतंग उडताना, काटाकाटीचा खेळ रंगताना दिसणार आहे.