मकर संक्रांत (Makar Sankrant) हा इंग्रजी कालदर्शिके नुसार नववर्षतला पहिला सण आहे. यंदा 14 ऐवजी 15 जानेवारीला हा सण साजरा केला जाणार आहे. ' अनेकदा या सणाविषयी सर्वांमध्ये समजुती गैरसमजुती दिसून येतात वास्तविक, 'संक्रांत येणे' म्हणजे वाईट गोष्टी ओढावणं असा शब्दप्रयोग असला तरीही मकरसंक्रांतीचा सण हा उत्साहाचा आहे नवचैतन्याचा असतो. पतंग उडवून, हलव्याचे दागिने आणि काळे कपडे असा साज करून आणि मुख्य म्हणजे तिळगुळाचे पदार्थ चाखून हा सण साजरा केला जातो. यानिमित्त आपल्या जवळच्या मंडळींसोबत सेलिब्रेशन करायला कोणाला आवडणार नाही? हो ना, पण या सणाला सुट्टी मिळेलच असे नाही, म्ह्णूनच मग निदान ऑनलाईन माध्यमातून तुम्ही आपल्या जवळच्या मंडळींना शुभेच्छा द्यायला हव्यात. तुम्हाला या शुभेच्छांसाठी फार शोधाशोध करावी लागू नये याची सोय आम्ही केलेली आहे, या Messages, HD Images, WhatsApp Status च्या माध्यमातून तुमच्या मित्रमैत्रणी, नातेवाईक आणि जवळच्या मंडळींना शुभेच्छा देऊन मकरसंक्रांतीच्या गोडी वाढवू शकता.
यंदा मकर संक्रांती ला चुकूनही घालू नका 'या' रंगाचे कपडे जे देतील अशुभाचे संकेत
खरतर अनेक सणांना शुभेच्छांचे मोठमोठे मॅसेज पाहून लोक वैतागतात पण या केवळ शुभेच्छा नसून याच्या माध्यमातून तुम्हाला समोरच्याची आठवण आहे हे दिसून येते, म्हणूनच अगदी थोडक्यात पण स्पेशल अशा शुभेच्छा तुमच्या प्रियजनांना Instagram, Whatsapp Status, Facebook च्या माध्यमातून पाठवायला विसरू नका. यासाठीच पाहुयात ही काही खास फ्री टू डाउनलोड शुभेच्छापत्र!
मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा
मकर संक्रांती निमित्त तुम्हास व तुमच्या परिवारास मनःपूर्वक शुभेच्छा
मकर संक्रांतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा
तीळ गूळ घ्या आणि गोड गोड बोला
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
महाराष्ट्रामध्ये मकर संक्रातीचा सण भोगी, मकर संक्रात आणि तिळवण (किंक्रांत) अशा तीन दिवसात साजरी केली जाते. यंदा 14 जानेवारी ते 16 जानेवारी या कालावधीत हा सण पार पडणार आहे. यावेळी फार नातेवाईकांना भेटणे शक्य नसेल तरी निदान एकाच घरात राहणाऱ्या आपल्या कुटुंबासोबत तरी वेळ घालवून ही मजा नक्की अनुभवा!