विवाहित महिला आणि नववधू ज्या सणाची आवर्जून वाट पाहत असतात तो सण म्हणजे मकर संक्रांत (Makar Sankranti). या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि उत्तरायणाला प्रारंभ होतो. हा सण महाराष्ट्रात मकर संक्रांत म्हणून तर तामिळनाडूत पोंगल तर पंजाबमध्ये लोहरी म्हणून साजरा केला जातो. संकासुराचा वध करण्यासाठी संक्रांतीचे रुप धारण केलेल्या देवीचे स्मरण करण्याचा दिवस. त्यामुळे पंचांगानुसार या देवीने मकर संक्रांती दिवशी जे वस्त्र परिधान केले आहे त्या रंगाचे कपडे घालू नये असे म्हटले आहे. दरवर्षी येणा-या मकर संक्रांतीला देवी वेगवेगळ्या रंगाचे कपडे घालते. त्यामुळे त्या रंगाचे कपडे घालू नये असे सांगितले जाते.
पंचांगानुसार, यंदा या देवीने पांढ-या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे. तिचे वाहन सिंह असून तिचे उपवाहन हत्ती आहे. तिचे शस्त्र भृशुंडी आहे. ती वयाने लहान दाखविली आहे. या देवीच्या हातात चाफ्याचे फुल आहे. ही देवी अन्न भक्षण करित आहे. यामुळे यंदा मकर संक्रांतीला पांढ-या रंगाचे वस्त्र घालू नये असे सांगण्यात आले आहे. Makar Sankranti 2020: मकर संक्रांतीवेळी 'या' राशींच्या व्यक्तींना होणार लाभ
ही देवी दक्षिणेकडून उत्तरेस जात आहे. ईशान्य दिशेस पहात आहे, म्हणून पूर्व पश्चिम वाणववसा करणे असेही पंचांगात म्हटले आहे. संक्रांतीला सकाळी सूर्योद्यापासून ते सूर्यास्तापर्यंत ही देवी भ्रमण करणार आहे.
फार वर्षापुर्वी संकारसुर नावाचा एक राक्षस होता. तो लोकांना फार पीडा देई. त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले. या संक्रांतीदेवीने संकारसुराला ठार केले आणि लोकांना सुखी केले. म्हणून सर्वांनी शक्यतो पांढ-या रंगाचे वस्त्र परिधान करु नये असे सांगण्यात आले आहे.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. लेटेस्टली मराठी यातुन कोणतीही अंधश्रद्धा पसरवू इच्छित नाही. )