भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याने घेतला मोठा निर्णय
MS Dhoni (Photo Credits: PTI)

भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) याने मोठा निर्णय घेऊन सर्वांना आश्चर्यचकीत केले आहे. धोनीचे लवकरच भारतीय संघात कम बॅक होणार, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मैदान गाजवणारा आणि गरजेच्या सामन्यात मोठे योगदान देणारा धोनी सध्या छोट्या पडद्यावर पदार्पण करणार असल्याचे कळत आहे. सोनी टिव्हीवर हा शो प्रसारीत होणार असून यात धोनीची काय भुमिका असणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा कार्यक्रम येत्या जून महिन्यात सुरु होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या नव्या प्रोजेक्टसाठी धोनीने स्टुडिओ नेक्स्ट सोबत करार केल्याचे सांगितले जात आहे.

सोनी टीव्हीवर सुरु होणाऱ्या कार्यक्रमात महेंद्र सिंह धोनी हा लष्करी अधिकाऱ्यांची गोष्ट लोकांपर्यंत पोहचवणार आहे. मात्र, धोनी हा या शोमध्ये एखाद्या भुमिकेत दिसणार की होस्ट करणार याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. हा शो भारतीय सशस्त्र दलाच्या खऱ्याखुऱ्या नायकांवर आधारित असणार आहे.  लष्करात असताना जवानांनी बजावलेली महत्वाची भुमिका तसेच परमचक्र, अशोकचक्र सन्मानित केलेल्या लष्कर अधिकाऱ्यांची साहसी गोष्टी धोनी सांगणार आहे. सध्या स्क्रिप्ट तयार केली जात असून लवकरच या कार्यक्रमाचे शूटिंगही सुरु होणार आहे. हे देखील वाचा- सानिया मिर्झा हिने शेअर केले बहीण अनाम मिर्झा च्या ब्राइडल शॉवर पार्टीचे फोटो, 'या' माजी दिग्गज क्रिकेटपटूच्या मुलासह करणार आहे लग्न, (Photos and Videos Inside)

विश्वचषक स्पर्धा संपल्यापासून धोनी हा संघाबाहेर आहे. नव्या खेळाडूंना संधी मिळावी म्हणून धोनीला बाहेर बसवण्यात आले आहे, अशी चर्चा रंगली होती. मात्र, आता धोनी भारतीय संघात कम बॅक करणार का ? असा प्रश्नही या ठिकाणी उपस्थित होत आहे.