सानिया मिर्झा हिने शेअर केले बहीण अनाम मिर्झा च्या ब्राइडल शॉवर पार्टीचे फोटो, 'या' माजी दिग्गज क्रिकेटपटूच्या मुलासह करणार आहे लग्न, (Photos and Videos Inside)
अनम मिर्झा आणि सानिया मिर्झा (Photo Credit: Instaragm)

टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) ची बहीण अनम मिर्झा (Anam Mirza) हिच्या ब्राइडल शॉवरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ऑक्टोबरमध्ये सानियाने सांगितले होते की तिची बहीण, आणि फॅशन स्टायलिस्ट अनमचे डिसेंबरमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन याचा मुलगा असद (Asad) याच्यासोबत लग्न करणार आहे. लग्नाच्या आधी अनम आणि सानियाने प्री वेडिंग बॅशमधील बरेच फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. फोटोंमध्ये अनमहलक्या गुलाबी रंगाचा स्कर्ट आणि व्हाईट टॉपमध्ये खूपच सुंदर दिसत आहे, तिची बहीण सानिया खूपच क्यूट दिसत आहे. फोटो शेअर करताना अनमने लिहिले आहे की जीवनात असे काही क्षण आहेत जे तुम्हाच्या मनाला स्पर्श करतात. माझ्या ब्राईडल शॉवरमध्ये मला असे वाटले की मी एक भाग्यवान आहे जे मला असे चांगले मित्र आणि कुटूंब मिळाले. काही महिन्यांपासून असद आणि अनमच्या लग्नाच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू होत्या. (सानिया मिर्झा ने 2 वर्षांच्या मॅटर्निटी ब्रेकनंतर आंतरराष्ट्रीय परतीची केली घोषणा, 'या' टूर्नामेंटमधून करणार टेनिस कोर्टवर पुनरागमन)

या ब्राइडल शॉवरची थीम फुलांनी सजली होती. सानिया आणि अनम दोघांनीही आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर या ब्राइडल शॉवरचे फोटोज शेअर केले आहेत. तुम्हीही या फोटोजच्या माध्यमातून या उत्सवाचा आनंद घेऊ शकतात. अनमचे हे दुसरे लग्न आहे. अनमचे 2015 मध्ये पहिले लग्न झाले होते, पण 2017 त्यांचा घटस्फोट झाला.

सानिया मिर्झाची पोस्ट

 

View this post on Instagram

 

Let’s get you married my baby girl 👰🏽 📸 - @thelumeweaver

A post shared by Sania Mirza (@mirzasaniar) on

अनम मिर्झा

असद हा भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनचा मुलगा असून सध्या तो गोवा क्रिकेट संघाकडून खेळत आहे. त्याने 6 डिसेंबर 2018ला 2018-119 रणजी करंडक स्पर्धेत गोव्यासाठी प्रथम श्रेणी पदार्पण केले. अनमपूर्वी सानियानेही क्रिकेटपटूशीच लग्न केले आणि सानिया आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांनी 2010 मध्ये भारतात लग्न केले.