भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) हिने गुरुवारी घोषणा केली की आगामी जानेवारी 2020 मध्ये होणार्या होबार्ट आंतरराष्ट्रीय (Hobart International) टूर्नामेंटपासून ती स्पर्धात्मक टेनिसमध्ये पुनरागमन करणार आहे. दोन वर्षांपासून मॅटर्निटी ब्रेकवर असलेली सानिया पुढील वर्षीच्या टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympic) साठी कोटा मिळविण्याच्या प्रयत्नात आहे आणि पुढील वर्षी जानेवारीपासून ती या मोहिमेची सुरुवात करणार आहे. 33 वर्षीय सानियाने अखेरच्या ऑक्टोबर 2017 मध्ये चायना ओपनमध्ये भाग घेतला होता. हॉबर्ट इंटरनेशनलमध्ये ती जागतिक क्रमवारीत 38 क्रमांकावरील युक्रेनच्या नादिया किचेनोक हिच्यासह महिला दुहेरीचे सामने खेळेल. पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक याच्यासह लग्न करणार्या सानियाने मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये मुलगा इझहानला जन्म दिला होता.
"मी होबर्टमध्ये खेळणार आहे, त्यानंतर मी ऑस्ट्रेलियन ओपन (Australian Open) खेळणार आहे. पुढील महिन्यातही मुंबईत होणाऱ्या एका स्पर्धेत (आयटीएफ महिला स्पर्धा) मी खेळणार आहे, पण या स्पर्धेत खेळणे माझ्या मनगटाच्या दुखापतीवर अवलंबून असेल. आम्ही ते पाहू, पण होबार्ट आणि ऑस्ट्रेलियन ओपन (निश्चितपणे), ”असे तिने पत्रकार परिषदेत सांगितले. सानियाने सहा ग्रँड स्लॅम जेतेपद जिंकली असून ती पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे सांगितले. दरम्यान, आगामी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सानिया अमेरिकेच्या राजीव रामबरोबर मिश्र दुहेरीचे सामने खेळेल.
मुंबईतील नवीन टेनिस कोर्टच्या उद्घाटनानंतर सानियाने सांगितले की ती ऑलिम्पिकचे तिकीट मिळविण्यासाठी प्रयत्न करणार. ती म्हणाली, "मी तीन वेळा ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला आहे आणि शेवटच्या वेळी दुर्दैवाने आम्हाला पदक जिंकता आले नाही. मी प्रयत्न कारेन आणि चौथ्यांदा ऑलिम्पिकमध्ये भाग घेणे हे माझ्यासाठी सन्मानजनक असेल. मला ऑलिम्पिकआधी पहिल्या तीन ग्रँड स्लॅममध्ये खेळण्याची संधी मिळेल."