इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधील आजच्या पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सामना मुंबई इंडियन्सशी (MI vs DD) होणार आहे. दोन्ही संघांमधील आतापर्यंतचे सामने जवळपास बरोबरीचे राहिले आहेत. दोन्ही संघ 30 वेळा एकमेकांशी भिडले आहेत. यामध्ये मुंबईने 16 तर दिल्लीने 14 सामने जिंकले आहेत. अशा स्थितीत आजचा सामनाही चुरशीचा ठरू शकतो. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) आधीच सांगितले आहे की तो इशान किशनसोबत (Ishan Kishan) ओपनिंग करणार आहे. दोन्ही खेळाडूंकडे विरोधी गोलंदाजी आक्रमणाला खिंडार पाडण्याची क्षमता आहे. आजच्या सामन्यात सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) नसेल, त्यामुळे युवा खेळाडू टिळक वर्माला पदार्पणाची संधी मिळू शकते.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा अंडर-19 खेळाडू डेवाल्ड ब्रेविस देखील खेळताना दिसणार आहे. ब्रेव्हिस हा 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेचा ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ होता. सिंगापूरचा क्रिकेटर टीम डेव्हिडलाही या सामन्यात उतरण्याची 100% शक्यता आहे. गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराहसोबत टायमल मिल्स, जयदेव उनाडकट आणि मयंक मार्कंडेय दिसू शकतात. तसे, किरॉन पोलार्ड आणि डेवाल्ड ब्रेविस हे देखील गोलंदाजीत हात आजमावताना दिसतात. हेही वाचा IPL 2022, MI vs DC: मुंबई इंडियन्स साठी गेल्या 9 वर्षांपासून ‘ही’ कामगिरी अशक्यच, आयपीएलमधील ‘हा’ डाग मिटवण्यात रोहितची ‘पलटन’ यावेळी होणार यशस्वी?
मुंबईचे संभाव्य 11: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, डॅनियन सॅम्स/डेवाल्डे ब्रेविस, टीम डेव्हिड, किरॉन पोलार्ड, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडेय.
आयपीएल 2022 मध्ये दिल्लीला वॉर्नर आणि नॉर्टजेची उणीव भासणार आहे. दिल्लीला त्यांच्या पहिल्या सामन्यात डेव्हिड वॉर्नर आणि एनरिक नॉर्टजे सारख्या मोठ्या खेळाडूंशिवाय जावे लागेल. तथापि, या संघाकडे भारताच्या युवा स्टार्सची मोठी फौज आहे, ज्यामुळे या सामन्यात मोठ्या नावांची कमतरता राहिली नाही. ऋषभ पंत आणि पृथ्वी शॉ अशी वेगवान फलंदाजांची जोडी संघात आहे. या सामन्यात हे दोघे सलामीवीर म्हणून दिसण्याची शक्यता आहे.
भारताचा अंडर-19 कर्णधार यश धुलही या सामन्याद्वारे आयपीएलमध्ये पदार्पण करू शकतो. फलंदाजांमध्ये त्यांच्या व्यतिरिक्त, टीम सेफर्ट आणि मनदीप सिंग प्लेइंग इलेव्हनमध्ये दिसू शकतात. दिल्लीकडे रोव्हमन पॉवेलच्या रूपाने एक मजबूत अष्टपैलू खेळाडूही आहे. दिल्लीची गोलंदाजी खूप मजबूत आहे. त्यात शार्दुल ठाकूर, खलील अहमद आणि चेतन साकारियासारखे चांगले वेगवान गोलंदाज आहेत. त्याचबरोबर संघाचे फिरकी आक्रमणही उत्कृष्ट आहे. संघात अक्षर पटेल आणि कुलदीप यादवसारखे दिग्गज फिरकीपटू आहेत.
दिल्लीचे संभाव्य 11: पृथ्वी शॉ, टीम सेफर्ट, यश धुल, मनदीप सिंग, ऋषभ पंत, रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, खलील अहमद, चेतन साकारिया