Zimbabwe National Cricket Team vs Afghanistan National Cricket Team, 1st Test Match Day 5 Scorecard: झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील (Test Series) पहिला सामना २६ डिसेंबरपासून खेळवला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना बुलावायो (Bulawayo) येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लबमध्ये (Queens Sports Club) खेळला जात आहे. झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत दोनदा आमनेसामने आले आहेत. या सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी 1-1 असा सामना जिंकला आहे. हा समान विक्रम दोन्ही संघांमधील स्पर्धा आणि संतुलित कामगिरी दर्शवतो. आगामी कसोटी मालिकेत कोणता संघ आघाडी घेतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. (हेही वाचा - New Zealand Beat Sri Lanka, 2nd T20I Match Scorecard: दुसऱ्या T20 सामन्यात, न्यूझीलंडने श्रीलंकेचा 45 धावांनी केला पराभव, जेकब डफीची शानदार गोलंदाजी, मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी)
अफगाणिस्तानचा पहिला डाव पहा
चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत अफगाणिस्तानने 156 षटकांत तीन गडी गमावून 515 धावा केल्या होत्या. पहिल्या डावात फलंदाजीला आलेल्या अफगाणिस्तान संघाची सुरुवातही निराशाजनक झाली आणि अवघ्या तीन धावांवर संघाला पहिला मोठा धक्का बसला. पहिल्या डावात 197 षटकांत 699 धावा करत अफगाणिस्तानचा संपूर्ण संघ सर्वबाद झाला. अफगाणिस्तान संघानेही पहिल्या डावात 113 धावांची आघाडी घेतली आहे. अफगाणिस्तानकडून कर्णधार हशमतुल्ला शाहिदीने 246 धावांची शानदार खेळी केली. या उत्कृष्ट खेळीदरम्यान हशमतुल्ला शाहिदीने 474 चेंडूंत 21 चौकारांच्या मदतीने 246 धावा केल्या.
हशमतुल्ला शाहिदीशिवाय रहमत शाहने 234 धावा केल्या. या स्फोटक खेळीदरम्यान रहमत शाहने 424 चेंडूत 23 चौकार आणि तीन षटकार ठोकले. तिसऱ्या विकेटसाठी दोन्ही फलंदाजांनी 364 धावांची चांगली भागीदारी केली. त्याचवेळी ट्रेव्हर ग्वांडूने झिम्बाब्वे संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. झिम्बाब्वेकडून ब्रायन बेनेटने सर्वाधिक 5 बळी घेतले. ब्रायन बेनेटशिवाय शॉन विल्यम्सने दोन बळी घेतले.
झिम्बाब्वेचा पहिला डाव
तत्पूर्वी बॉक्सिंग डे कसोटीत झिम्बाब्वेचा कर्णधार क्रेग एरविनने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या झिम्बाब्वे संघाची सुरुवात चांगली झाली आणि दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 43 धावांची भागीदारी केली.
पहिल्या डावात झिम्बाब्वेचा संपूर्ण संघ 135.2 षटकांत 586 धावा करत सर्वबाद झाला. झिम्बाब्वेसाठी शॉन विल्यम्सने सर्वाधिक 154 धावांची खेळी खेळली. या उत्कृष्ट खेळीदरम्यान शॉन विल्यम्सने 174 चेंडूत 10 चौकार आणि तीन षटकार ठोकले. शॉन विल्यम्सशिवाय ब्रायन बेनेटने नाबाद 110 धावा केल्या.
या दोघांशिवाय क्रेग एर्विनने 104 धावा केल्या. दुसरीकडे, नावेद झद्रानने अफगाणिस्तान संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. अफगाणिस्तानसाठी एएम गझनफरने सर्वाधिक तीन बळी घेतले. एएम गझनफरशिवाय नावेद झदरन, झहीर खान आणि झिया-उर-रहमान यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.