ज़िम्बाब्वें वि. पाकिस्तान (Photo: @ZimCricketv/@TheRealPCB)

Zimbabwe National Cricket Team vs Pakistan National Cricket Team 1st T20I Match 2024: झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना उद्या म्हणजेच 1 डिसेंबर रोजी होणार आहे. बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लब येथे भारतीय वेळेनुसार 5 वाजल्यापासून दोन्ही संघांमधील सामना खेळला जाईल. हा सामना दोन्ही संघांसाठी नव्या सुरुवातीची संधी असेल. टीम इंडियाविरुद्ध टी-20 मालिका गमावल्यानंतर झिम्बाब्वे संघाला पुनरागमन करायचे आहे, तर पाकिस्तानही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3-0 अशा पराभवानंतर पुन्हा गती मिळवण्याचा प्रयत्न करेल. पहिल्या टी-20 सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.  (हेही वाचा  -  ZIM vs PAK 1st T20I Match 2024 Pitch Report And Weather Update: झिम्बाब्वे आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी होणार रोमांचक सामना, जाणून घ्या सामन्यापूर्वी खेळपट्टीचा अहवाल आणि हवामान परिस्थिती)

पाहा पोस्ट -

झिम्बाब्वे आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत 18 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. या काळात पाकिस्तान संघाचे पारडे जड झाले आहे. पाकिस्तान संघाने 16 सामने जिंकले आहेत. तर झिम्बाब्वेला केवळ दोनच सामने जिंकता आले आहेत.

पाहा दोन्ही संघ:

पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): सैम अयुब, तय्यब ताहीर, ओमेर युसूफ, उस्मान खान (विकेटकिपर), सलमान आगा (कर्णधार), इरफान खान, जहांदद खान, अब्बास आफ्रिदी, अबरार अहमद, हारिस रौफ, सुफियान मुकीम

झिम्बाब्वे (प्लेइंग इलेव्हन): तादिवानाशे मारुमनी (विकेटकिपर), ब्रायन बेनेट, डिओन मायर्स, सिकंदर रझा (कर्णधार), रायन बर्ल, क्लाइव्ह मदांडे, ताशिंगा मुसेकिवा, वेलिंग्टन मसाकादझा, रिचर्ड नगारावा, ब्लेसिंग मुझाराबानी, ट्रेव्हर ग्वांडू