Happy Birthday Yuvraj Singh: युवराज सिंहने लगावला 'जय जवान, जय किसान' नारा, पत्राद्वारे वडील योगराज यांच्या टिप्पण्यांवर दिली 'अशी' प्रतिक्रिया (See Post)
युवराज सिंह (Photo Credits: Getty Images)

Yuvraj Singh Birthday Wish: भारताचा वर्ल्ड कप विजेता अष्टपैलू क्रिकेटर युवराज सिंह (Yuvraj Singh) आज आपला 39वा वाढदिवस साजरा करत आहे. युवीने वाढदिवसाचे निमित्त साधत ट्विटरवर पोस्ट शेअर केली ज्यात त्याने शेतकऱ्यांचे आंदोलनावर (Farmers Protest) आपले मत मांडले आणि वडील योगराज सिंह (Yigraj Singh) यांनी केलेल्या विधानाशी आपला संबंध नसल्याचेही स्पष्ट केले. युवराज म्हणाला की, NCR मधील शेतकरी निषेधावर आपले योगराज सिंह यांच्या भाषणामुळे आपण दु:खी आणि नाराज आहोत आणि त्याची विचारसरणी वडिलांप्रमाणेच नाहीत. शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात सुरू असलेल्या चर्चेचे त्वरित निराकरण करण्याची इच्छा असल्याचेही युवराजने व्यक्त केली. माजी भारतीय अष्टपैलूने देश कोरोना व्हायरसशी (Coronavirus) लढत देत असताना कोविड-19 विषाणू आणि संसर्गाविरुद्ध आवश्यक सावधगिरी बाळगण्याचे आव्हान चाहत्यांना देखील केले आहे. युवराज सिंहने ट्विटरवर दिलेल्या निवेदनात म्हटले की, "निःसंशयपणे, शेतकरी हे देशाचे जीवनवाहक आहेत आणि माझा विश्वास आहे की शांततापूर्ण चर्चेतून ही समस्या सुटू शकेल." (Farmer's Protest: पंजाब क्रिकेट टीम कर्णधार मनदीप सिंह याचा शेतकरी मोर्चात सक्रिय सहभाग, हरभजन सिंहने ही दिला पाठिंबा)

"वाढदिवस ही इच्छा पूर्ण करण्याची संधी असते आणि हा वाढदिवस साजरा करण्याऐवजी मी फक्त आमच्या शेतकरी आणि सरकार यांच्यात सुरू असलेल्या चर्चेच्या त्वरित निराकरणासाठी प्रार्थना करतो," युवीने पोस्टमध्ये पुढे म्हटले. आपले वडील योगराज यांच्या टिप्पणींवर भाष्य करताना युवी म्हणाला की, "योगराज सिंह यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मी दु:खी व व्यथित आहे. त्यांची टिप्पणी वैयक्तिक क्षमतेने केली गेली आहे आणि माझी विचारसरणी कोणत्याही प्रकारे एकसारखी नसल्याचे मला स्पष्ट करायचे आहे," युवराज पुढे म्हणाले. योगराज सिंह यांनी सोमवारी केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकण्याची विनंती केली, आणि आणि शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ पुरस्कार परत करणाऱ्या खेळाडूंना पाठिंबा दर्शवला.

योगराज म्हणाले की, "शेतकरी योग्य गोष्टीची मागणी करत आहेत, सरकारने त्यांचे म्हणणे ऐकले पाहिजे. सरकारने आता यासंदर्भात तोडगा काढला पाहिजे आणि जे सर्व प्रतिष्ठित पुरस्कार परत करत आहेत त्या सर्व खेळाडूंना मी पाठिंबा देतो."