मनदीप सिंह आणि हरभजन सिंह (Photo Credit: Twitter)

Farmer's Protest in India: पंजाब रणजी क्रिकेट टीम कर्णधार आणि किंग्ज इलेव्हन पंजाबचा खेळाडू मनदीप सिंह (Mandeep Singh) सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला (Farmers Protest) पाठिंबा दर्शविणारा पहिला सक्रिय भारतीय क्रिकेटपटू म्हणून झालेल्या शेतकरी निषेधात सामील झाला. टीम इंडियासाठी (Team India) तीन आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळणारा मनदीपने दिल्लीच्या सिंहू सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना भेट दिली. देशातील शेतकऱ्यांच्या निषेधाने जगभरात सर्वांचे लक्ष वेधले आहे. केंद्र सरकारने काही सुधारक विधेयक आणून दिलेले शेतकरी विधेयक मंजूर झाल्यानंतर या आंदोलनाला उधाण आले. हे शेतकऱ्यांना पसंत पडले नाही आणि त्यांनी नवीन कायद्यांचा निषेध केला व त्यामध्ये दुरुस्ती करण्याची मागणी केली. बरेच नामांकित चेहरे या आंदोलनात सामील झाले. मनदीप सिंह देखील आपल्या भावासोबत निषेधात सामील झाला. शिवाय, हरभजन सिंहने (Harbhajan Singh) देखील शेतकऱ्यांसाठी आपला पाठिंबा दर्शवला आहे. (Farmers Protest: सरकारने जर हा काळा कायदा मागे न घेतल्यास राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार परत करणार- बॉक्सर विजेंदर सिंह)

मनदीप सिंहने आपला भाऊ आणि काही इतरांसह स्वत:चा एक फोटो पोस्ट केला तर हरभजनने सोशल मीडियावर एक ट्विट केले आणि शेतकरी हा भारताचा अभिमान आहे असे म्हटले. यासह, मनदीप निषेधांमध्ये भाग घेणारा पहिला सक्रिय भारतीय क्रिकेटपटू बनला. पाहा मनदीपची पोस्ट: 

 

View this post on Instagram

 

A post shared by Mandeep Singh (@mandeeps12)

आणखी एक

 

View this post on Instagram

 

A post shared by Mandeep Singh (@mandeeps12)

हरभजन सिंहचे ट्विट

भज्जीचे आणखी एक ट्विट

दरम्यान, मनदीप सिंहने एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की त्याचे वडील जिवंत असते तर ते देखील या निषेधात सामील झाले असते. तो म्हणाला की, "कडाक्याच्या थंडीत शांततेत निषेध करणार्‍या सर्व ज्येष्ठ नागरिकांना माझे समर्थन दर्शविण्यासाठी मी तिथे गेलो होतो." गेल्या 13 दिवसांहुन अधिक वेळापासून पंजाब आणि हरियाणा येथील शेतकरी कृषी कायदे मागे घेतले जावेत यासाठी रस्त्यावर आंदोलन करत आहेत. केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमधली चर्चा अजुनही निष्फळ ठरली आहे.