आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतलेला युवराज सिंह (Yuvraj Singh) पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात षटकारांचा पाऊस पडण्यास सज्ज होत आहे. आपल्या आक्रमक खेळीची ओळखला जाणारा युवराज कॅनडा (Canada) तील ग्लोबल टी-20 लीग (Global T-20 League) मध्ये टोरंटो नॅशनल्स (Toronto Nationals) संघासाठी खेळणार आहे. जूनमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्तीची घोषणा करत युवराज ने टी-20 लीगमध्ये खेळण्याची बीसीसीआय (BCCI) कडे इच्छा व्यक्त करत परवानगी मागितली होती. (Yuvraj Singh Retires: सचिन तेंडुलकर, विराट कोहली, हरभजन सिंग, वीरेंद्र सेहवागने केले भावनात्मक Tweet)
या ग्लोबल टी-20 लीगमध्ये सहा संघ आहेत. यामध्ये क्रिकेट विश्वातले अनेक दिग्गज खेळतात. यंदा होणार ग्लोबल टी-20 लीगच हे दुसरं वर्ष आहे. यात दक्षिण आफ्रिकेचा फाफ डु प्लेसी (Faf du Plessis), जे. पी ड्युमिनी (JP Duminy), वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल (Chris Gayle), ड्वेन ब्राव्हो (Dwayne Bravo), आंद्रे रसेल (Andre Russell), किरन पोलार्ड (Kieron Pollard), सुनील नरेन (Sunil Narine), डेरेन सॅमी (Darren Sammy), न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson) , ब्रेंडन मॅक्युलम (Brandon McCullum), कॉलिन मुनरो (Collin Munro), ऑस्ट्रेलियाचा ख्रिस लीन (Chris Lynn), जॉर्ज बेली (George Bailey), बेन कटिंग (Ben Cutting), पाकिस्तानचा शोएब मलिक (Shoaib Malik), श्रीलंकेचा थिसारा परेरा (Thisara Perera) हे खेळाडू असणार आहेत.
बीसीसीआयच्या नियमांनुसार भारतात क्रिकेट खेळणारे खेळाडू परदेशी टी-20 लीगमध्ये भाग घेऊ शकत नाहीत. याआधी निवृत्ती घेतल्यानंतर वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) आणि जहीर खान (Zaheer Khan) युएई (UAE) मध्ये झालेल्या टी-10 लीगमध्ये खेळले आहेत.