Yuvraj Singh (Photo Credits: Facebook)

टी 20 क्रिकेटमध्ये 6 चेंडूत 6 षटकार मारणारा आणि वनडे क्रिकेटमध्ये तुफान फटकेबाजीच्या जोरावर भारताला विश्वचषक जिंकून देणारा युवराज सिंग (Yuvraj Singh) सोमवारी (10 जून) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. युवराजच्या निवृत्तीच्या घोषणेने त्याचे चाहतेच नाही तर टीम इंडियातील त्याचे साथीदारही भारावून गेले. वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag), व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman), विराट कोहली (Virat Kohli) ने त्याच्या यशस्वी कारकिर्दीचे अभिनंदन केले. सचिन तेंडुलकरला आदर्श मानणार्‍या युवराजला त्याच्या आयडॉल कडूनही खास शुभेच्छा मिळाल्या आहेत. (युवराज सिंह याच्या निवृत्तीनंतर चाहत्यांच्या सोशल मीडियावर भावूक प्रतिक्रीया)

परिपूर्ण चॅम्पियन-विराट

त्याच्या लढा आणि इच्छाशक्तीसह बर्‍याच लोकांना प्रेरणा मिळाली- सेहवाग 

तू देशासाठी काय केले त्याचा अभिमान बाळग- कैफ 

हरभजन सिंग

प्रत्येक वेळी संघाला आवश्यक असणारा खरा विजेता म्हणून बाहेर आला आहे.

सिक्सर किंग्स म्हणून ओळखला जाणाऱ्या युवराजच्या नावे बरेच आंतराष्ट्रीय रेकॉर्ड आहे. २००७च्या टी २० सामन्यात त्यानं इंग्लंडविरोधात स्टुअर्ट ब्रॉडला सहा चेंडूत सहा षटकार मारले होते. त्यानंतर 2011च्या विश्व चषकामध्ये आपल्या मारक खेळीने भारताला दुसरं विश्व कप जिंकण्यास साहाय्य केले आणि विश्वचषकाचा तो, मालिकावीर ठरला.

२०११ विश्व कप नंतर युवराजला रक्ताचा कर्करोग झाल्यामुळं तो काही काळ क्रिकेटपासून लांब होता. आजारपणानंतर परतलेल्या युवीला मात्र वनडेमध्ये चमक दाखवण्यात अपयशी ठरला. आपल्या आजारपणामुळे युवराज २०१७ नंतर एकही वनडे सामना खेळला नाही. आपल्या कारकिर्दीत युवराजने ३०४ वनडे सामने, ४० कसोटी आणि ५८ टी २० सामने खेळले आहेत.