युवराज सिंह याने शेअर केला वीरेंद्र सहवाग, आशिष नेहरा सोबतचा थ्रोबॅक फोटो, कॅप्शन वाचून यूजर्सना झाले हसू अनावर
(Photo Credit: Instagram)

लॉकडाउन दरम्यान क्रिकेटपटू सोशल मीडियावर बरेच खेळाडू सक्रिय दिसत आई. भारतीय संघाचा सुपरस्टार युवराज सिंहने (Yuvraj Singh) इंस्टाग्रामवर एक जुना फोटो शेअर केला, जो खूप लोकप्रिय होत आहे. युवीने आपल्या भारतीय संघाच्या (Indian Team) सुरुवातीच्या काळातील एक फोटो शेअर केला ज्यामध्ये व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman), वीरेंद्र सहवाग (Virender Sehwag) आणि आशिष नेहरा (Ashish Nehra) टेलिफोन बूथजवळ बोलताना दिसत आहेत. चाहत्यांना हा फोटो खूप पसंत पडत आहे. हा फोटो पाहून हरभजन सिंह याने कमेंट केली आणि लिहिले, "फ्री कॉल." ट्विटर आणि इंस्टाग्रामवर हा फोटो शेअर करताना युवीने कॅप्शन लिहिले, ज्यामुळे केवळ त्याच्या चाहत्यांनाच नव्हे तर या तीन क्रिकेटर्सच्या चाहत्यांनाही हसू अनावर झाले. या फोटोमध्ये युवराज, सहवाग, लक्ष्मण आणि नेहरा एका विमानतळाच्या सार्वजनिक टेलिफोन बूथमध्ये एकत्र वेगवेगळ्या फोनवर बोलताना दिसत आहेत. (टी-20 मधील सर्वात जलद अर्धशतकाचा रेकॉर्ड कोण मोडणार? माजी सिक्सर किंग युवराज सिंह ने स्वतःचा विक्रम मोडण्यासाठी घेतली दोन नावं)

युवराजने फोटो कॅप्शनमध्ये लिहिले की, "जेव्हा खराब कामगिरीनंतर आपले पालक तुमचा मोबाइल बिल देत नाहीत. थ्रोबॅक... ते दिवस जेव्हा मोबाइल फोन नव्हते." हा फोटो खूप मजेदार आहे आणि त्यावर यूजर्स भरघोस प्रतिक्रिया देत आहे. पाहा फोटो:

बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपियानेही यावर भाष्य केले आणि म्हणाली की बऱ्याच काळानंतर मी एक छान फोटो पाहिला आहे. माजी भारतीय वेगवान गोलंदाज मुनाफ पटेल यानेही टिप्पणीमध्ये लिहिले की हा एक उत्तम फोटो आहे.

युवीने 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला. युवीने 2000 मध्ये केनियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. काही काळापूर्वी युवराजने सोशल मीडियावर युवा खेळाडूंवर टीका केली होती. तो म्हणाला, "मला वाटते, ते जास्त प्रयत्न करत आहेत. ते सोशल मीडियावर नसलेले व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करीत आहेत." जसप्रीत बुमराह सोबत एका इन्स्टाग्राम लाइव्ह सेशनमध्ये युवराज म्हणाला, "मी बरेच सभ्य खेळाडू पहिले आहेत पण सोशल मीडियावर ते काहीतरी वेगळंच बनले आहेत."