कोविड-19 (COVID-19) च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाउन दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा सलामी फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) इन्स्टाग्रामवर क्रिकेटपटूंची मुलाखत घेत असून मंगळवारी त्याने भारतीय संघाचा माजी अष्टपैलू युवराज सिंह (Yuvraj Singh) यांच्याशी संवाद साधला. माजी अष्टपैलू युवराजने म्हणाला की सध्याच्या संघात विराट कोहली आणि तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळणारे रोहित शर्मा वगळता जास्त रोल मॉडेल नाही. शिवाय,टीममध्ये सिनिअर खेळाडूंबद्दल आदराची पातळीही कमी झाली आहे. 2007 टी-20, 2011 च्या विश्वचषकात जिंकलेला संघ आणि आता विराट कोहलीच्या नेतृत्वात असलेल्या संघातील फरक स्पष्ट करत युवी म्हणाला की, “आमच्या टीममधील आणि आताच्या काळामधील फरक मला जाणवतो तो म्हणजे ज्येष्ठ लोक खूप शिस्तबद्ध होते. सोशल मीडिया नसल्याने विचलित होत नव्हतो.” तो म्हणाला, "आम्हाला एका विशिष्ट मार्गाने स्वतःला हाताळावे लागले. आम्ही आमच्या ज्येष्ठ खेळाडूंकडे ते माध्यमात कसे बोलतात आणि इतर सर्व काही पाहत होतो. तो समोरून नेतृत्व करायचे. हे आम्ही त्यांच्याकडून शिकलो आणि सर्वांनाही सांगितले." (Coronavirus लॉकडाउन दरम्यान गस्त घालणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांच्या हृदयस्पर्शी कृतीने युवराज सिंह झाला भावुक, Video शेअर करून व्यक्त केला सलाम)
रोहित म्हणाला जेव्हा तो पहिल्यांदा संघात आला तेव्हा तो वरिष्ठांनी भरला होता आणि आता तसे नाही आणि मूड हलका झाला आहे. “जेव्हा मी आलो, तेव्हा तिथे बरेच वरिष्ठ होते, पण आता वातावरण हलके झाले आहे.” दुसरीकडे, युवराज म्हणाला, या संघात आप (रोहित) आणि तिन्ही फॉरमॅट खेळणारे विराटसारखे वरिष्ठ आहेत. मला वाटतं की सोशल मीडियात आल्यापासून असे बरेच कमी खेळाडू ज्यांच्याकडे पहिले जाऊ शकते. ज्येष्ठांबद्दलचा आदर कमी झाला आहे."
शिवाय, युवी हार्दिक पंड्या आणि केएल राहुलच्या प्रसिद्ध कॉफी विथ करण शोवरील वादाचा हवाला देत म्हणाला की, "असं काही घडेल याची आम्हाला कल्पनाही नव्हती. त्यांचीही चूक नाही. आयपीएलचे करारदेखील खूप मोठे आहेत. जरी खेळाडू भारताकडून खेळत नसले तरी बरीच कमाई करतात."