Coronavirus लॉकडाउन दरम्यान गस्त घालणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांच्या हृदयस्पर्शी कृतीने युवराज सिंह झाला भावुक, Video शेअर करून व्यक्त केला सलाम
युवराज सिंहने केला महाराष्ट्रातील पोलिसांना सलाम (Photo Credit: Insta/Getty)

संपूर्ण जग सध्या कोरोना व्हायरसविरूद्ध (Coronavirus) लढाई लढत आहे. भारतात रुग्णालयांमधील डॉक्टर आणि रस्त्यावर आणि रस्त्यांवरील पोलिस स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांना आवश्यक तशी मदत करत आहेत. टीम इंडिया वर्ल्ड कप विजयी फलंदाज माजी अष्टपैलू युवराज सिंह (Yuvraj Singh) ने अशाच काही पोलिसांपुढे दंडवत घातले आहे. युवराजने शनिवारी त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला ज्यामध्ये काही पोलिस रस्त्यावर एका गरीबाला स्वतःचा आहार देत आहेत. युवराजने त्यांच्या या प्रयत्नांचे कौतुक केले. युवीने व्हिडिओ पोस्ट केला आणि लिहिले: “या पोलिस कर्मचार्‍यांनी दाखवलेली माणुसकीचे कृत्य पाहून खरोखर आनंद होतो. या कठीण काळात त्यांच्या दयाळूपणे वागण्याबद्दल आणि स्वतःचे भोजन सामायिक केल्याबद्दल त्यांच्याबद्दल खूप आदर आहे." भारतात होणाऱ्या कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे देशात 21 दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. यामुळे बर्‍याच गरीब लोकांना अन्न मिळू शकत नाही. अशा स्थितीत वाटसरूला आपले अन्न देणे खरोखरच प्रशंसनीय आणि पुण्याचे काम आहे. (महाराष्ट्रात Lock Down वाढणार का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले 'हे' उत्तर)

देशात पोलीस 24 तास आपले कर्तव्य बजावत आहेत आणि याच पोलिसांना युवीने हा व्हिडिओ पोस्ट करून सलाम केला.  युवराजने पोस्ट केलेला व्हिडिओ महाराष्ट्रातील (Maharashtra) आहे. गस्त घालणाऱ्या पोलिसांनी त्या वाटसरूला रस्त्याच्या कडेला सावलीत बसायला सांगितलं. त्याची आपुलकीने विचारपूस केली. विचारपूस करताना तो वाटसरू चार दिवसांपासून उपाशी असल्याचे पोलिसांना समजलं. त्यानंतर त्या पोलिसांपैकी एकाने चक्क आपल्या डब्यातील जेवण त्या वाटसरूला खाऊ घातले. तीन पोलीस अधिकारी त्या वृद्ध व्यक्तीला 'तुला जेवण मिळालं का?' असं विचारताना ऐकू येऊ शकतात. एकीकडे, पोलीस लोकांसाठी आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहे, तर दुसरीकडे अनेक ठिकाणी नागरिकांनी पोलिसांवर हल्ले केल्याचे वृत्त समोर येत आहे. पाहा हा भावनिक व्हिडिओ:

दरम्यान, काही दिवसांपासून युवी देखील चर्चेत बनून आहे. अलीकडेच पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद अफरीदीच्या मदतीसाठी युवराजने सोशल मीडियावर मदत मागितली, ज्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी त्याच्याविरूद्ध मोर्चा उघडला आहेत. यानंतर युवराजनेही लोकांना प्रतिसाद दिला. युवीने म्हणाला की, कोणालाही दुखवण्याचा त्याचा हेतू नव्हता आणि त्याने केवळ मानवतेसाठी त्याची मदत केली.