मुंबई: युवराज सिंगचे (Yuvraj Singh) वडील आणि माजी क्रिकेटर योगराज सिंग (Yograj Singh) यांनी पुन्हा एकदा 2011 चा विश्वचषक विजेता कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर (MS Dhoni) निशाणा साधला आहे. योगराज सिंह अनेकदा सार्वजनिक मंचावर धोनीवर टीका करतात. धोनीवर युवराजची कारकीर्द बरबाद केल्याचा आरोप ते करत असतात. मात्र, युवराज सिंगने धोनीबाबत असा कोणताही दावा केलेला नाही. तो नेहमीच धोनीबद्दल सकारात्मक बोलताना दिसतो. (हे देखील वाचा: IPL 2025: युवराज सिंगला आयपीएलमध्ये मिळणार मोठी जबाबदारी, दिल्ली कॅपिटल्स ताफ्यात होऊ शकतो सामील)
योगराज सिंगने साधला धोनीवर निशाणा
नुकतीच योगराज सिंह यांनी झी स्विचला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान योगराजने पुन्हा धोनीवर युवराजचे करिअर बरबाद केल्याचा आरोप केला आहे. धोनीला मी कधीही माफ करू शकत नाही, असे त्याने म्हटले आहे. धोनीबाबत ते म्हणाले, 'मी एमएस धोनीला माफ करणार नाही. त्याने त्याचा चेहरा आरश्यात बघायला पाहिजे. तो महान क्रिकेटर आहे, पण त्याने माझ्या मुलाचे काय केले हे आता समोर येत आहे. त्याला कधीच माफ करता येणार नाही. मी माझ्या आयुष्यात दोन गोष्टी कधीच केल्या नाहीत – पहिली, माझ्यावर अन्याय करणाऱ्याला मी कधीच माफ केले नाही. दुसरे, मी कधीही कोणाला मिठी मारली नाही, जरी तो माझ्या कुटुंबाचा किंवा माझ्या मुलांचा सदस्य असला तरीही.
Yuvraj Singh's father Yograj Singh lashes out at India's ex captain MS Dhoni 👀#YuvrajSingh #YograjSingh #MSDhoni #Indiancricket #Insidesport #Crickettwitter pic.twitter.com/TFSIYm11K1
— InsideSport (@InsideSportIND) September 1, 2024
'त्याने माझ्या मुलाचे आयुष्य उद्ध्वस्त केले'
धोनीवर निशाणा साधत ते म्हणाले, 'त्या माणसाने (एमएस धोनी) माझ्या मुलाचे आयुष्य उद्ध्वस्त केले. युवराज अजून चार ते पाच वर्षे खेळू शकला असता. मी सर्वांना आव्हान देतो की युवराजसारख्या मुलाला जन्म द्या.' गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवाग यांनीही याआधी युवराज सिंग सारख कोण नसल्याचं म्हटलं आहे. कॅन्सरशी खेळून देशासाठी विश्वचषक जिंकल्याबद्दल त्याला भारतरत्न देऊन सन्मानित केले पाहिजे.