Year Ender 2020: षटकारांचे बादशाह! यंदा ‘या’ खेळाडूंनी वनडेमध्ये ठोकले सर्वाधिक षटकार, पाहा आकडा
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 3rd वनडे (Photo Credit: PTI)

Most ODI Sixes in 2020: यंदा जगभरात कोरोना व्हायरसने भीतीचे वातावरण निर्माण केले. मार्च महिन्यात अनेक देशांमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह (Cricket) अनेक क्रीडा स्पर्धा पुढे ढकलल्या किंवा रद्द करण्यात आल्या. कोरोनाने प्रभावित झालेल्या यंदाच्या वर्षात कमीप्रमाणात क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या गेल्या आणि क्रिकेट याला अपवाद नाही. जून महिन्यात खेळ पुन्हा सुरू झाल्यानंतर बर्‍याच खेळाडूंनी आपल्या चांगल्या खेळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. जगातील एक रोमांचक खेळ म्हणून ओळ्खल्याणाऱ्या क्रिकेट मधेही मैदानात परतताच खेळाडूंनी षटकार आणि चौकारांचा वर्षाव करतात. या प्रकरणात, यंदा 2020 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार (Most ODI Sixes in 2020) ठोकणार्‍या तीन खेळाडूंनी त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत. (Top Sporting Moments of 2020: 2020 मधील क्रिकेटचे 'हे' क्षण कायम राहतील चाहत्यांच्या आठवणीत)

ग्लेन मॅक्सवेल

ऑस्ट्रेलियन अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलने यंदा एकदिवसीय स्वरूपात केवळ सहा सामने खेळले ज्यात त्याने 22 षटकार ठोकले. या दरम्यान, त्याने 20 चौकारही लगावले. यावर्षी मॅक्सवेलने शतक आणि तीन अर्धशतकांसह एकूण 353 धावा केल्या आहेत.

केएल राहुल

या यादीतील दुसरे नाव भारतीय क्रिकेट संघाचा स्टार बहु-प्रतिभावान फलंदाज केएल राहुलचे आहे. राहुलने यंदा एकदिवसीय स्वरुपात एकूण नऊ सामने खेळले. ज्यामध्ये त्याने 16 षटकार आणि 29 चौकार लगावले. 2020 मध्ये राहुलने तीन अर्धशतकांच्या खेळीसह 443 धावा काढल्या.

आरोन फिंच

ऑस्ट्रेलियाच्या मर्यादित ओव्हरचा कर्णधार फिंच या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. फिंचने 2020 मध्ये 13 सामने खेळले असून त्यात दोन शतके ठोकून 673 धावा केल्या. फिंचने या दरम्यान 65 चौकारांसह 14 षटकार ठोकले.

लक्षात घेण्यासारखे म्हणजे यंदा भारतीय संघाने न्यूझीलंड आणि ऑस्ट्रलिया दौऱ्यावर तीन वनडे सामन्यांची मालिका खेळली होती. यानंतर दक्षिण आफ्रिकाविरुद्ध वनडे मालिका सुरु होण्यापूर्वीच कोरोना महामारीमुळे रद्द करण्यात आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर ब्रेक लागला. यानंतर भारतीय खेळाडूंनी आयपीएलमधून कमबॅक केलं आणि अखेर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 3 सामन्यांची 50-ओव्हर मालिका खेळली. यामध्ये टीम इंडियाला 2-1 अशा पराभवाला सामोरे जावे लागले.