India National Cricket Team vs England National Cricket Team: भारत विरुद्ध इंग्लंड पहिला एकदिवसीय सामना नागपुरात खेळला गेला, जो टीम इंडियाने 4 विकेटने जिंकला. फिल सॉल्ट आणि बेन डकेटने झटपट धावा केल्यामुळे इंग्लंडने चांगली सुरुवात केली होती आणि एकत्रितपणे 75 धावा जोडल्या होत्या. नवव्या षटकात सॉल्ट धावबाद झाला आणि पुढच्याच षटकात यशस्वी जैस्वालने 32 धावांवर बेन डकेटला बाद करण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. ( IND Beat ENG 1st ODI Scorecard: पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा दणदणीत विजय, गोलंदाजांनंतर श्रेयस-शुभमन आणि अक्षर पटेल चमकले)
जैस्वालने मागे धावताना हा झेल घेतला, त्यामुळे त्याचे खूप कौतुक होत आहे. आता अक्षर पटेलने त्यांची फिरकी घेतली आहे. नागपूर एकदिवसीय सामन्यात भारताच्या 4 विकेट्सने विजय मिळवल्यानंतर बीसीसीआयने एक व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे, ज्यामध्ये टीम इंडियाचे खेळाडू जयस्वालसोबत मस्ती करताना दिसत होते.
पाहा व्हिडिओ -
Glue Hands 💪
Gold Reactions 😎#TeamIndia members share their take and react to Yashasvi Jaiswal's athletic catch on Debut 🔥
WATCH 🎥🔽 #INDvENG | @IDFCFIRSTBankhttps://t.co/05aafDrod0
— BCCI (@BCCI) February 7, 2025
खूप छान झेल...
यशस्वी जैस्वालच्या झेलवर अक्षर पटेलला प्रश्न विचारण्यात आला. तो म्हणाला, "मी त्या पोझिशनवर उभा होतो जिथून जैस्वालने कॅच पकडण्यासाठी कशी प्रतिक्रिया दिली हे मला दिसले. खाली पाहताना त्याने एकदा धाव घेतली आणि मला वाटले की त्याने आपले लक्ष गमावले आहे. पण त्याने संपूर्ण शरीर ताणून झेल घेतला आणि मी हे सर्व पाहिले. माझ्या दृष्टीने तो खूप चांगला झेल होता.
याच व्हिडीओ क्लिपमध्ये अक्षर पटेल यशस्वी जैस्वालची खिल्ली उडवत म्हणाला, "अरे, लाजाळू कशाला यार? पूर्ण स्ट्रेच केल्यानंतरच झेल घेतला, त्यामुळे त्यात काही अडचण नाही भाऊ. खूप छान झेल."