WTC Final: टीम इंडिया आणि विजेतेपदामध्ये Kane Williamson चा मोठा अडथळा, त्याच्यात अधिक कमजोरी नसल्याचा भारतीय दिग्गज गोलंदाजाचा दावा
न्यूझीलंड कर्णधार केन विल्यमसन (Photo Credit: PTI)

ICC WTC Final: साऊथॅम्प्टन (Southampton) येथे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (World Test Championship Final) सामन्यात न्यूझीलंड (New Zealand) ही एक मजबूत बाजू आहे आणि भारतीय गोलंदाजांनी कर्णधार केन विल्यमसनला (Kane Williamson) लवकरात लवकर पॅव्हिलियनमध्ये पाठवले पाहिजे असे मत भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने (Umesh Yadav) व्यक्त केले. “आम्हाला केनच्या खेळाविषयी चांगली कल्पना आहे, तरी मला वाटत नाही की त्याच्याकडे बरीच कमजोरी आहे. अर्थात, कोणताही दर्जेदार फलंदाज चांगल्या चेंडूवर आऊट होऊ शकतो, म्हणून वेगवान गोलंदाज म्हणून तुम्ही आपल्या बळकट बाबींकडे चिकटून रहायला हवे आणि तुम्हाला विकेट मिळवू शकेल अशी गोलंदाजी केली पाहिजे. आणि हो, आम्हाला केनला लवकरात लवकर आऊट करण्याची गरज आहे जेणेकरुन संघाला नक्कीच फायदा होईल,”यादवने The Telegraph ला सांगितले. (ICC WTC Final: केन विल्यमसनचा किवी संघ ‘या’ 4 कारणांमुळे बनू शकतो आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल विजयाचा दावेदार)

“न्यूझीलंड मजबूत सिंग आहे. त्यांची खोल फलंदाजी आहे आणि त्यांचे वेगवान अनुभवी व घातक वेगवान गोलंदाज आहेत. त्यामुळे खेळ खडतर होईल. इंग्लिश परिस्थिती खेळणे आमच्यासाठी एक मोठे आव्हान आहे आणि न्यूझीलंडसारख्या संघाविरुद्ध खेळणे देखील आव्हानात्मक आहे,” त्याने पुढे म्हटले. दोन्ही संघातील हा आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम (ICC World Test Championship Final) सामना रोमांचक ठरणार आहे कारण भारत (India) आणि न्यूझीलंडने यापूर्वी तटस्थ ठिकाणी कधीही कसोटी सामना खेळला नाही. घराबाहेर टीम इंडियाने (Team India) फक्त पाच कसोटी सामने जिंकले असून ते किवीविरुद्ध संघर्ष करताना दिसले तर न्यूझीलंड 10 सामन्यात विजयी झाले असून 10 सामने अनिर्णित राहिले आहेत. यादव म्हणाला की, कसोटीपटू म्हणून आम्हाला शिस्तीबद्धपणे खेळावे लागेल. शेवटपर्यंत खेळाच्या सर्व विभागांमध्ये शिस्त दर्शवावी लागेल. जो विभागांमध्ये ही शिस्त दाखवेल तो पुढे जाईल.”

दरम्यान, येत्या काही दिवसांत मुंबईमध्ये भारतीय खेळाडू इंग्लंडला रवाना होण्यासाठी एकत्रित होणार आहे. मुंबईमधील एका हॉटेलमध्ये काही काळ क्वारंटाईन राहिल्यावर ‘विराटसेना’ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होईल. या दौऱ्यावर न्यूझीलंड विरोधात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्याशिवाय यजमान संघाविरुद्ध कसोटी मालिका देखील खेळली जाणार आहे. इंग्लंड आणि भारतामधील कसोटी मालिका ऑगस्ट महिन्यात सुरु होणार आहे.