Wriddhiman Saha: निवडकर्त्यांनी दाखवला बाहेरचा रस्ता, संतप्त यष्टीरक्षकाने प्रशिक्षक राहुल द्रविडवर साधला निशाणा, सौरव गांगुली यांच्यावरही केले आरोप
सौरव गांगुली आणि राहुल द्रविड (Photo Credit: PTI)

श्रीलंका (Sri Lanka) विरोधात कसोटी मालिकेसाठी संघातून वगळलेला भारताचा यष्टिरक्षक रिद्धिमान साहा (Wriddhiman Saha) याने शनिवारी धक्कादायक खुलासा केला आणि म्हटले की BCCI अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी न्यूझीलंड मालिकेनंतर त्याला कसोटीत स्थान देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी त्याला “निवृत्ती” बद्दल विचार करण्यास सांगितले कारण यापुढे त्याचा निवडीसाठी विचार केला जाणार नाही. गेल्या काही महिन्यांपासून भारतीय क्रिकेट वादात सापडले आहे. यापूर्वी विराट कोहलीच्या कर्णधार पदावरून वाद निर्माण झाला होता, आता साहाच्या मुलाखतीत असेच काहीसे केले आहे. साहाचे नाव कसोटी संघातून वगळण्यात आले, त्यानंतर त्याची एक मुलाखत समोर आली. यामध्ये त्याने बीसीसीआय अध्यक्ष गांगुली आणि संघाचा मुख्य प्रशिक्षक द्रविड यांच्यावर आरोप करण्यात आले. (IND vs SL Series: आगामी श्रीलंका मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, रोहित शर्माची कसोटी कर्णधारपदी नियुक्ती)

साहा यापूर्वी न्यूझीलंडच्या भारत दौऱ्यावरील कसोटी मालिका खेळला, पण दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाचा भाग होता परंतु त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही. यानंतर साहाने रणजी ट्रॉफी, देशांतर्गत स्पर्धेतूनही माघार घेतली कारण यानंतर त्याची भारतीय संघात निवड होणार नसल्यचे त्याला सांगण्यात आले होते. “संघ व्यवस्थापनाने मला सांगितले की यापुढे माझा विचार केला जाणार नाही. जोपर्यंत मी भारतीय संघ सेटअपचा भाग आहे तोपर्यंत मी हे सांगू शकत नाही,” असे स्फोटक वक्तव्य रिद्धिमानने शनिवारी केले. “अगदी प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी मला निवृत्ती घेण्याचा विचार कर असे सुचवले,” त्याने मुख्य प्रशिक्षकासोबतच्या वर्गीकृत संभाषणांवर भाष्य केले.

साहाने बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनाही फटकारले. साहाने दावा केला की त्याने संघातील त्याच्या स्थानाबद्दल काळजी करू नये असे आश्वासन गांगुलीने दिले असल्याचे म्हटले.

न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीत भारताला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी दुखापतग्रस्त असूनही 61 धावांची महत्त्वपूर्ण नाबाद खेळी केल्यावर गांगुलीने त्याला संदेश दिल्याचे साहाने सांगितले. दरम्यान श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेतही KS Bharat याचा दुसरा विकेटकीपर म्हणून समावेश झाला आहे. आघाडीचा यष्टीरक्षक रिषभ पंत असून साहाला वगळण्यात आले आहे. मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांनीही स्पष्ट केले की ते भविष्यातील यष्टीरक्षक म्हणून भरतकडे पाहत आहेत.