ICC WTC Final: भारत-न्यूझीलंड महाअंतिम सामन्यापूर्वी Michael Vaughan यांची मोठी भविष्यवाणी, म्हणाले- ‘हा’ संघ बनू शकतो टेस्ट चॅम्पियनशिपचा विजेता
भारतीय क्रिकेट टीम (Photo Credit: IANS)

World Test Championship 2021: भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) संघात होणाऱ्या पहिल्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (ICC World Test Championship) पहिल्या फायनल सामन्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे. 18 जून रोजी साऊथॅम्प्टन (Southampton) येथील एजस बाउल स्टेडियम महाअंतिम लढतीचे आयोजन करेल. भारत आणि न्यूझीलंड या दोघांनी अलीकडेच कसोटी क्रिकेटमध्ये अपवादात्मक कामगिरी केली आहे आणि आयसीसीच्या कसोटी क्रमवारीतही (ICC Test Rankings) अव्वल दोन स्थानावर ताबा मिळवला आहे. चाहते रोमांचक सामन्याची अपेक्षा करत असताना इंग्लंडचे माजी दिग्गज माइकल वॉन (Michael Vaughan) यांनी आयसीसीच्या जागतिक कसोटी स्पर्धेच्या विजेतेपदासाठी एक स्पष्ट विजेता निवडला आहे. इंग्लंडच्या माजी कर्णधारानुसार किवी संघासाठी देशातील भौगोलिक स्थिती ओळखीची असल्यामुळे केन विल्यमसनचे (Kane Williamson) ब्लॅककॅप्स (BlackCaps) विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार असतील. उल्लेखनीय म्हणजे, भारताविरुद्ध अंतिम सामन्यापूर्वी विल्यमसनची दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत यजमान इंग्लंडशी सामना करेल. म्हणूनच, त्यांना परिस्थितीशी जुळवून घेण्याची उत्तम संधी आहे. (World Test Championship 2021: न्यूझीलंड-टीम इंडिया WTC फायनल सामन्यात हे 3 खेळाडू ठरू शकतात ‘मॅन ऑफ द टूर्नामेंट’ पुरस्काराचे दावेदार)

स्पार्क स्पोर्टशी बोलताना वॉनने न्यूझीलंडला विजेते म्हणून निवडले. “न्यूझीलंड (जिंकेल). इंग्लिश स्थिती, ड्यूक बॉल आणि व्यस्त वेळापत्रकानंतर भारत…एका आठवड्याआधी ते पोहोचतील आणि थेट सामन्यात प्रवेश करतील, [आणि] न्यूझीलंडकडे दोन कसोटी सामने आहेत, अंतिम फेरीसाठी तयार करण्यासाठी ते इंग्लंडविरुद्ध सामना असा दावा आपण करू शकता. तर हे माझ्यासाठी अगदी स्पष्ट आहे,” वॉनने स्पार्क स्पोर्टला सांगितले. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून भारतीय खेळाडू सामना खेळत नसल्यामुळे सामन्यांच्या सरावाची त्यांच्यात कमी असेल यात काही शंका नाही. 14 दिवस मुंबईत क्वारंटाईन आणि साउथॅम्प्टनला पोहचल्यावर 10 दिवस आयसोलेट केल्यावर मालिकेच्या तयारीसाठी भारतीय संघाला फक्त एक आठवडा मिळेल. दुसरीकडे, ब्लॅककॅप्सचे खेळाडू यापूर्वीच यूकेमध्ये पोहोचले आहेत आणि सध्या क्वारंटाईन आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी ते दोन कसोटी सामने खेळतील.

दरम्यान, लक्षात घेण्यासारखे म्हणजे गेल्या वर्षी वॉनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटीत ‘विराटसेने’च्या अपमानजनक पराभवानंतर भारताला 4-0 असा सफाया होईल असे म्हटले होते तथापि, भारतीय खेळाडूंनी त्यांना चुकीचं सिद्ध करत 2-1 ने मालिका जिंकून कांगारू संघाला मोठा धक्का दिला. दरम्यान, टीम इंडियाचा WTC फायनल जिंकण्याचा निर्धार असेल आणि ऑस्ट्रेलिया मालिकेप्रमाणे त्यांच्याकडे पूर्ण ताकदीचा संघ आहे. तथापि, त्यांच्याकडे तयारीसाठी जास्त वेळ नाही. त्यामुळे उद्घाटन WTC अंतिम सामन्यात कोण बाजी मारतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.