विराट कोहली आणि आर अश्विन (Photo Credit: Twitter/BCCI)

World Test Championship 2021: न्यूझीलंड (New Zealand) आणि भारतात (India) आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (ICC World Test Championship) 2019-21 फायनल सामन्यासाठी आता मोजकेच दिवस शिल्लक राहिले आहेत. साउथॅम्प्टनच्या रोस बाऊल (Rose Bowl) क्रिकेट स्टेडियम आयसीसीचा प्रतिष्ठित अंतिम सामना रंगणार आहे. भारतीय संघाने  (Indian Team) ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2020-21 मध्ये ऑस्ट्रेलियाचा 2-1 ने पराभव केला. नंतर, घरच्या मैदानावर इंग्लंडचा 3-1ने पराभव केला आणि न्यूझीलंडविरुद्ध अंतिम सामन्यात आपले स्थान निश्चित केले. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये 520 गुणांसह पहिल्या क्रमांकावर राहिली. दुसरीकडे, न्यूझीलंडने 420 गुणांसह WTC पॉईंट्स टेबलमध्ये दुसरे स्थान मिळवले. दरम्यान, आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये मॅन ऑफ द टूर्नामेंट (WTC Man of the Tournament) पुरस्कार जिंकण्याच्या शर्यतीत काही खेळाडूंनी दावेदारी ठोकली आहे. आयसीसी जागतिक कसोटी स्पर्धेत मॅन ऑफ द टूर्नामेंट पुरस्कार जिंकू शकणार्‍या 3 प्रमुख खेळाडूंची नावे खालीलप्रमाणे आहेत. (ICC WTC Final: केन विल्यमसनचा किवी संघ ‘या’ 4 कारणांमुळे बनू शकतो आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल विजयाचा दावेदार)

रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin)

अश्विन हा आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ‘मालिकावीर’ पुरस्कार जिंकणारा सर्वात मोठा दावेदार आहे. अश्विन हा या स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारा तिसरा क्रमांक आहे. त्याने 24 डावात 67 बळी घेतले आहेत. अश्विन हा आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ‘मालिकावीर’ पुरस्कार जिंकणारा सर्वात मोठा दावेदार आहे. अश्विन या स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारा तिसरा गोलंदाज आहे. त्याने 24 डावात 67 विकेट्स घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्स आणि इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडला मागे टाकण्यासाठी त्याला 4 विकेट्सची गरज आहे. कमिन्स आणि ब्रॉडने अनुक्रमे 70 आणि 69 विकेट्स काढल्या आहेत. न्यूझीलंडविरुद्ध आअंतिम सामन्यादरम्यान अश्विन त्यांना नक्कीच मागे टाकू शकेल. शिवाय, अश्विननेही शतक झळकावले आहे. त्यामुळे, अश्विन आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये मॅन ऑफ द टूर्नामेंट पुरस्कार जिंकण्यासाठी आघाडीचा दावेदार आहे.

केन विल्यमसन (Kane Williamson)

टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी विल्यमसनच्या खांद्यावर असेल. संघासाठी तिसऱ्या स्थानावर त्याच्याकडे मोठी जबाबदारी असेल. विल्यमसनने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या 9 सामन्यात 58.35 च्या सरासरीने एकूण 817 धावा केल्या आहेत. किवी संघाच्या फायनलपर्यंतच्या प्रवाश्यात विल्यमसनची महत्वाची भूमिका राहिली आहे. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे तो ‘मॅन ऑफ द टूर्नामेंट’चा पुरस्कार जिंकू शकतो.

मार्नस लाबूशेन (Marnus Labuschagne)

ऑस्ट्रेलियन संघ जरी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पोहोचू शकला नसला तरी या संपूर्ण स्पर्धेत मार्नस लाबूशेनने शानदार कामगिरी बजावली आहे. लाबूशेनने कांगारू संघासाठी 11 चॅम्पियनशिप सामन्यात 72.82 सरासरीने 1675 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 5 शतके आणि 9 अर्धशतके देखील ठोकली आहे. या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर तो आयसीसी कसोटी स्पर्धेत प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कार जिंकण्याचा प्रबळ दावेदार असू शकतो.