भारतीय महिला क्रिकेट टीम (Photo Credit: Twitter/ICC)

Women's World Cup 2022: आयसीसी महिला विश्वचषक (ICC Women's World Cup) स्पर्धेचे काउंटडाऊन सुरु झाले आहे. 4 मार्चपासून न्यूझीलंड (New Zealand) येथे एकदिवसीय वर्ल्ड कपचे आयोजन होणार आहे. 2017 मध्ये इंग्लंडच्या लॉर्ड्सच्या मैदानात झालेल्या अंतिम सामन्यात मिताली राज (Mithali Raj) हिच्या भारतीय संघाला (Indian Team) पराभव पत्करून उपविजेते पदावर समाधान मानावे लागले होते. टीम इंडिया त्यावेळी विश्वचषकपासून एक फक्त पाऊल दूर होती, पण पराभवामुळे संघाच्या आपल्या पहिल्या जेतेपदाची प्रतीक्षा आणखी वाढली. अशा परिस्थितीत यावेळी गेल्या वेळेची चूक सुधारून संघ पहिले वर्ल्ड कप काबीज करू इच्छित असेल. भारतीय संघाला या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा (Pakistan) सामना करावा लागणार आहे. या विश्वचषकासाठी भारताने आपला प्रमुख संघ कायम ठेवला आहे. संघाची कर्णधार अनुभवी मिताली राज असेल, तर उपकर्णधार हरमनप्रीत कौर आहे. (Women's World Cup 2022: अशी 5 कारणे ज्यामुळे भारतीय संघ बनतो विश्वचषक विजयाचा दावेदार, ‘या’ खेळाडूंची भूमिका निर्णायक ठरेल)

विश्वचषकपूर्वी भारतीय संघाला न्यूझीलंड दौऱ्यावर मर्यादित शतकांच्या मालिकेत, एकमेव टी- आणि पाच वनडे सामने, पराभवाचे तोंड पाहायला लागले. तसेच स्मृती मंधाना हिला सराव सामन्यात झालेल्या दुखापतीने टीम इंडियाची चिंता वाढली. पण मंधानाला फिटनेस क्लिअरन्स मिळाला आहे आणि ती स्पर्धेच्या सुरुवातीपासून प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्यास सज्ज आहे. दरम्यान न्यूझीलंड येथे महिला विश्वचषक स्पर्धेत वेळ आणि तारखेनुसार भारताचे संपूर्ण वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान - 6 मार्च - सकाळी 6:30

भारत विरुद्ध न्यूझीलंड - 10 मार्च - सकाळी 6:30

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज - 12 मार्च - सकाळी 6:30

भारत विरुद्ध इंग्लंड - 16 मार्च - सकाळी 6:30

भारत वि ऑस्ट्रेलिया - 19 मार्च - सकाळी 6:30

भारत विरुद्ध बांगलादेश - 22 मार्च - सकाळी 6:30

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - 27 मार्च - सकाळी 6:30

महिला विश्वचषक भारतीय संघ: मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, यस्तिका भाटिया, रिचा घोष, तानिया भाटिया, स्नेह राणा, झुलन गोस्वामी, पूजा वस्त्राकर, मेघना सिंह, रेणुका सिंह ठाकूर, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव.