Video: शेफाली वर्मा ने श्रीलंकाविरुद्ध महिला टी-20 वर्ल्ड कप मॅचमध्ये स्टंपच्या मागून मारलेला चौकार पाहून व्हाल चकित
शेफाली वर्माने स्टंपच्या मागून मारला चौकार (Photo Credits: Twitter)

आपल्या बेपर्वा स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेली भारताची सलामी फलंदाज शेफाली वर्मा (Shafali Verma) टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup)  मध्येही जोरदार कामगिरी करत आहेत. 16 वर्षीय शेफालीने श्रीलंकाविरूद्ध 34 चेंडूत 47 धावा फटकावल्या आणि भारतीय महिला संघाला (India Women's Cricket Team) श्रीलंका (Sri Lanka) विरुद्ध अखेरच्या लीग सामन्यात सात गडी राखून विजय मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. मेलबर्न येथे 113 धावांच्या छोट्या लक्ष्याच्या उत्तरात या सलामी फलंदाजाने भारतासाठी 47 धावांचा शानदार डाव खेळला आणि टीमचा विजय निश्चित केला. यावेळी, प्रत्येकाला धक्का बसेल असा शॉट तिने मारला. या विजयासाठी 11 षटकांत 40 धावांची आवश्यकता असताना ही घटना घडली. (Women's T20 World Cup 2020: राधा यादव नंतर शेफाली वर्मा ने खेळला तुफानी डाव, श्रीलंकेला 7 विकेटने पराभूत करत भारत लीग स्टेजमध्ये अजिंक्य)

कर्णधार हरमनप्रीत 12 चेंडूंत शेफालीसह क्रीजवर 15 धावा करून खेळत होती. फिरकीपटू शशिकला श्रीवर्धनेने 10 वी ओव्हर टाकण्यासाठी आली. पहिला चेंडू ऑफ स्टम्पच्या बाहेर आला, हा बॉलही वाइड असू शकला असता परंतु या आधीच चौकार मारल्याने हरियाणच्या या छोरीने क्रीजच्या आत जाऊन शॉर्ट फाईन लेगवर अकल्पनीय शॉट मारला. शेफाली स्टंपच्या मागे गेली आणि बॉलला सीमारेषेच्या पालिककडे पाठवले. पाहा हा व्हिडिओ:

16 वर्षांच्या शेफालीने स्पर्धेत आजवरच्या चार सामन्यांमध्ये 161 धावा केल्या असून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादीत दुसर्‍या क्रमांकावर आहे. तिने 4 सामन्यांत 18 चौकार आणि 9 षटकार लगावले असून तिचा स्ट्राइक रेट 161 आहे. श्रीलंकाविरुद्ध सामन्यात शेफालीला दोन जीवदान मिळाले. आपले सर्व सामने जिंकल्यानंतर सेमीफायनल फेरी गाठणारा भारत पहिला संघ बनला. कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली की विजय अभियान कायम ठेवणे महत्त्वाचे आहे. आता भारताचा पुढील सामना सेमीफायनलमध्ये 5 मार्च रोजी होईल. भारताने लीग फेरीत यजमान ऑस्ट्रेलिया, नंतर बांग्लादेश, न्यूझीलंड आणि अखेरीस श्रीलंकेचा पराभव केला. भारताने लीग फेरीतील 4 पैकी 4 सामने जिंकले आणि 8 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान कायम ठेवले. आता ग्रुप अ मधील दुसऱ्या टीमचा निर्णय सोमवारी ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमधील सामन्यानंतर होईल.