महिला आशिया चषक स्पर्धेत (Women's Asia Cup 2022) भारताने दमदार कामगिरी करत अंतिम सामन्यात श्रीलंकेचा (Sri Lanka) धुव्वा उडवला. परिणामी महिला आशिया चषक भारताच्या खिशात आला. सिल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (Sylhet International Cricket Stadium), सिलहेत येथे हा रोमहर्षक सामना शनिवारी (15 ऑक्टोबर) झाला. अंतिम फेरीसाठी झालेल्या या सामन्यात भारताने श्रीलंकेचा आठ खेळाडू राखून दणदणीत पराभव केला. विशेष म्हणजे एकूण आठ पर्वांमध्ये भारताने हा चषक जिंकून सातव्यांदा आपले जेते पद कायम राखले. पाठिमागील 14 वर्षांमध्ये पहिल्यांदाच अंतिम सामना खेळत असलेल्या श्रीलंकेने पहिल्यांदा फलंदाजी करणयाचा निर्णय घेतला. परंतू निसरड्या खेळपट्टीवर हा निर्णय पूरता फसला. भारताने 8.3 षटकांत नऊ बाद 65 धावाच केल्या. स्मृती मंधाना (Smriti Mandhana) हिने 25 चेंडूत नाबाद 51 धावा केल्या.
श्रीलंकेची कर्णधार चामारी अथापथू (Chamari Athapaththu ) तिसऱ्या षटकात धावबाद झाली. त्यानतर अनुष्का संजीवनी ही सुद्धा 6 चेंडूत धावबाद झाल्याने श्रीलंकेचा संघ लवकर ढेपाळला. ऑगस्टमध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेपासून अव्वल फॉर्ममध्ये असलेली भारतीय गोलंदाज रेणुका ठाकूर हिने श्रीलंकेच्या हसिनी परेरा हिलाला पहिल्याच चेंडूवर माघारी पाठवले. त्यामुळे श्रीलंकेची अवस्था चार बाद नऊ अशी बिकट झाली. (हेही वाचा, Womens Asia Cup 2022 Final: अंतिम फेरीत श्रीलंकेचा पराभव, भारताने विक्रमी 7व्यांदा आशिया चषकाचे विजेतेपद पटकावले)
चार बाद नऊ अशी बिकट अवसथा असताना श्रीलंकेला भागीदारीची नितांत गरज होती. एखादी जोडी मैदानावर टीकणे अतिशय आवश्यक होते. परंतू मैदानावर जम बसविण्याचा प्रयत्न करणाऱ्या कविशा दिलहरी हिला रेणुकाने बाद केले. त्यामुळे लंकेची स्थिती 6 बाजा 16 अशी लाजीरवाणी झाली.
भारतीयांनी शिस्तीने गोलंदाजी केली ज्यामुळे श्रीलंकेचा मर्यादित षटकांमध्येच धुव्वा उडाला. उपांत्य फेरीत पाकिस्तानवर जोरदार विजय मिळविल्यानंतर श्रीलंका अंतिम फेरीपर्यंत पोहोचली होती.