Photo Credit - Twitter

शनिवारी सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा (IND vs SL) 8 गडी राखून पराभव करून विक्रमी सातव्यांदा महिला आशिया चषक (India Win a Womens Asia Cup 2022 Final) जिंकला. भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी करताना श्रीलंकेला 20 षटकांत 9 गडी गमावून अवघ्या 65 धावांत रोखले आणि त्यानंतर 8.3 षटकांत 2 गडी गमावून लक्ष्य गाठले. मंधानाने (Smriti Mandhana) षटकार ठोकत भारताला आशियाचा चॅम्पियन बनवले. महिला आशिया चषक स्पर्धेचा हा आठवा हंगाम होता, तर भारताचा हा सातवा विजेतेपद होता. भारताने वनडे फॉरमॅटमध्ये चार वेळा आणि टी-20 फॉरमॅटमध्ये तीन वेळा महिला आशिया कप जिंकला आहे.

भारताकडून स्मृती मंधानाने नाबाद 51 आणि कर्णधार हरमनप्रीत कौरने नाबाद 11 धावांचे योगदान दिले. गोलंदाजीत वेगवान गोलंदाज रेणुका सिंह ठाकूरने 3 षटकात 5 धावा देत 3 बळी घेतले. त्याच्याशिवाय राजेश्वरी गायकवाड आणि स्नेह राणा यांना प्रत्येकी दोन यश मिळाले.

भारत सातव्यांदा बनला चॅम्पियन

भारताने 2018 च्या हंगामाशिवाय प्रत्येक वेळी हे विजेतेपद पटकावले आहे. भारतीय महिला संघाने यापूर्वी 2004, 2005-06, 2006, 2008, 2012 आणि 2016 मध्ये आशिया कप जिंकला होता.