SL vs NZ (Photo Credit - X)

Sri Lanka National Cricket Team vs New Zealand National Cricket Team: श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गॉले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे. न्युझीलंड संघाची कमान टिम साउथीकडे आहे तर श्रीलंका संघाची कमान धनंजया डी सिल्वाकडे आहे. श्रीलंकेचा संघ नुकताच इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. जिथे श्रीलंकेला तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने पराभवाला सामोरे जावे लागले होते. दुसरीकडे, न्यूझीलंडचा संघ नुकताच एका कसोटी सामन्यासाठी भारतात आला होता. मात्र पावसामुळे कसोटी सामना रद्द करण्यात आला. अशा परिस्थितीत दोन्ही संघांमध्ये रोमांचक कसोटी मालिका पाहायला मिळू शकते. त्याआधी श्रीलंकाने टाॅस जिंकून फलंदाजी करण्याच निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या श्रीलकांने आपले पाच विकेट गमावल्या आहेत. श्रीलंकेचा स्कोर 178/5