कोलकाता: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ (IND vs ENG 1st T20I) यांच्यातील 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना आज म्हणजेच 22 जानेवारी रोजी कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर (Eden Gardens, Kolkata) खेळला जाईल. सूर्यकुमार यादवकडे (SuryaKumar Yadav) भारतीय टी-20 संघाची कमान आहे. तर जोस बटलरकडे (Jos Buttler) इंग्लडं संघाचे नेतृत्व आहे. या मालिकेत सर्वांच्या नजरा मोहम्मद शमीवर (Mohammed Shami) असतील जो तंदुरुस्त होऊन पुनरागमन करत आहे. चाहत्यांना दोन्ही संघांमधील रोमांचक लढाई पाहता येईल. तथापि, पहिल्या टी-20 दरम्यान हवामान कसे असेल? हवामान खात्याचा अहवाल काय सांगतो?
कसे असेल हवामान ?
अॅक्यूवेदरच्या मते, सामन्याच्या दिवशी कोलकातामध्ये हवामान चांगले असेल. कमाल तापमान 28 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील तर किमान तापमान 16 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची अपेक्षा आहे. दिवसा पाऊस किंवा वादळाचा अंदाज नसल्याने सामन्यात पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता नाही. बुधवारी 3% ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. (हे देखील वाचा: IND vs ENG 1st T20I 2025 Dream11 Prediction: कोलकातामध्ये रंगणार भारत आणि इंग्लंड टी-20 सामना, त्याआधी निवडा सर्वोत्तम ड्रीम 11 संघ)
कशी असेल खेळपट्टी?
कोलकात्यातील ईडन गार्डन्स स्टेडियम सहसा फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही अनुकूल असते, परंतु टी-20 सामन्यांमध्ये पाठलाग करणारे संघ अनेकदा विजयी होतात. खेळपट्टी ताजी असल्याने, सामन्याच्या सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना मदत मिळू शकते. पण जसजशी खेळपट्टी खराब होत जाईल तसतसे फिरकीपटू खेळात येतील. एकंदरीत, एक रोमांचक सामना पाहायला मिळतो. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
इंग्लंडची प्लेइंग 11: बेन डकेट, फिलिप साल्ट (विकेटकीपर), जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, जेमी ओव्हरटन, गस अॅटकिन्सन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वूड
भारताची संभाव्य प्लेइंग 11: संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), नितीश रेड्डी, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग.