IND vs ENG (Photo Credit - X)

कोलकाता: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ (IND vs ENG 1st T20I) यांच्यातील 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना आज म्हणजेच 22 जानेवारी रोजी कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर (Eden Gardens, Kolkata) खेळला जाईल. सूर्यकुमार यादवकडे (SuryaKumar Yadav) भारतीय टी-20 संघाची कमान आहे. तर जोस बटलरकडे (Jos Buttler) इंग्लडं संघाचे नेतृत्व आहे. या मालिकेत सर्वांच्या नजरा मोहम्मद शमीवर (Mohammed Shami) असतील जो तंदुरुस्त होऊन पुनरागमन करत आहे. चाहत्यांना दोन्ही संघांमधील रोमांचक लढाई पाहता येईल. (हे देखील वाचा: IND vs ENG 1st T20I 2025 Preview: आज भारत आणि इंग्लंड यांच्यात रंगणार पहिला टी-20 सामना, प्लेइंग इलेव्हन, हेड टू हेड आणि मॅच प्रेडिक्शनसह सर्व काही घ्या जाणून)

हेड टू हेड आकडेवारी

भारत आणि इंग्लंड संघ 24 वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यामध्ये भारताचा वरचष्मा असल्याचे दिसते. भारताने 24 पैकी 13 सामने जिंकले आहेत. तर इंग्लंडने 11 सामने जिंकले आहेत. याशिवाय एक सामना अनिर्णीत राहिला. हे सर्वज्ञात आहे की जेव्हा जेव्हा दोन्ही संघ एकमेकांशी भिडतात तेव्हा एक कठीण स्पर्धा होते. पण भारताचा रेकॉर्ड चांगला आहे.

पिच रिपोर्ट

कोलकात्यातील ईडन गार्डन्स स्टेडियम सहसा फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही अनुकूल असते, परंतु टी-20 सामन्यांमध्ये पाठलाग करणारे संघ अनेकदा विजयी होतात. खेळपट्टी ताजी असल्याने, सामन्याच्या सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना मदत मिळू शकते. पण जसजशी खेळपट्टी खराब होत जाईल तसतसे फिरकीपटू खेळात येतील. एकंदरीत, एक रोमांचक सामना पाहायला मिळतो. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.

सर्वोत्तम संभाव्य ड्रीम 11 संघ

कर्णधार आणि उपकर्णधार: हार्दिक पंड्या (कर्णधार), जोस बटलर (उपकर्णधार).

यष्टीरक्षक: संजू सॅमसन, जोस बटलर, फिल साल्ट (तिघांपैकी एक निवडू शकता)

फलंदाज: सूर्यकुमार यादव, अभिषेक शर्मा, हॅरी ब्रुक, जोस बटलर

अष्टपैलू खेळाडू: हार्दिक पांड्या, लियाम लिव्हिंगस्टोन

गोलंदाज: जोफ्रा आर्चर, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी

इंग्लंडची प्लेइंग 11: बेन डकेट, फिलिप साल्ट (विकेटकीपर), जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, जेमी ओव्हरटन, गस अ‍ॅटकिन्सन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वूड

भारताची संभाव्य प्लेइंग 11: संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), नितीश रेड्डी, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग.