IND vs NZ 3rd T20 2022: हार्दिक पांड्या संघात करणार बदल? संजु सॅमसन आणि उमरानला मिळणार संधी? काय असु शकते प्लेइंग-11
Team India (Photo Credit - Twitter)

भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तीन टी-20 मालिकेतील शेवटचा सामना आज मंगळवारी (22 नोव्हेंबर) होणार आहे. टीम इंडिया नेपियरच्या मॅक्लीन पार्कवर उतरेल तेव्हा मालिका जिंकण्याकडे लक्ष असेल. वेलिंग्टनमध्ये पावसामुळे मालिकेतील पहिला टी-20 सामना रद्द करण्यात आला होता. त्याचवेळी माऊंट मौनगानुई येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात भारताने 65 धावांनी विजय मिळवला. अशाप्रकारे त्याने मालिकेत 1-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. न्यूझीलंडबद्दल सांगायचे तर, त्यांना सामना जिंकुन मालिका बरोबरीने संपवायची आहे. या मैदानावर ते भारताविरुद्ध प्रथमच टी-20 सामना खेळणार आहे.

नेपियरमध्ये भारतीय संघाला खेळण्याचा अनुभव नाही

क्रिकेटच्या छोट्या फॉरमॅटमध्ये इथे खेळण्याचा अनुभव टीम इंडियाला नाही. याचा फायदा किवी संघ घेऊ शकतो. न्यूझीलंडला येथे चार टी-20 सामने खेळण्याचा अनुभव आहे. 2017 मध्ये त्याने येथे बांगलादेशचा पराभव केला होता. त्यानंतर 2019 मध्ये इंग्लंड आणि 2020 मध्ये पाकिस्तानविरुद्ध पराभव झाला होता. 2021 मध्ये किवी संघाने पुन्हा नेपियरमध्ये बांगलादेशचा पराभव केला. (हे देखील वाचा: Napier Weather Updates Live: IND vs NZ मध्ये होणार आज तिसरा T20 निर्णायक सामना; कसे असेल हवामान, वाचा खेळपट्टीचा अहवाल)

संजु सॅमसन आणि उमरान मलिक यांना मिळेल का संधी?

आता प्रश्न असा पडतो की टीम इंडिया तिसऱ्या टी-20मध्ये बदल घेऊन उतरणार का? वेगवान गोलंदाज उमरान मलिक आणि यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसन यांना संघात आणण्याची मागणी होत आहे. आता त्यांना संधी मिळते की नाही हे पाहावे लागेल. संजू सॅमसन सलामीला एक उत्तम पर्याय ठरू शकतो. आयपीएलमधील अनेक सामन्यांमध्ये तो याच क्रमाने खेळला आहे. त्याचवेळी उमरान मलिकला आयर्लंड दौऱ्यावर खेळण्याची संधी मिळाली होती. तेव्हापासून तो आपल्या वळणाची वाट पाहत आहे.

असा असु शकतो संघ

भारत: ऋषभ पंत/संजू सॅमसन, इशान किशन, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंह/उमरान मलिक, मोहम्मद सिराज.