केन विल्यमसन, आरोन फिंच (Photo Credit: Twitter/cricketcomau)

जुनी सवय मोडणे कठीण असते हे मात्र सर्व मंजूर करतील. यजमान ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये आजपासून 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्या दरम्यान सिडनीमध्ये याचेच एक उदाहरण पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलिया (Australia) आणि न्यूझीलंड (New Zealand) कर्णधार आरोन फिंच (Aaron Finch) आणि केन विल्यमसन (Kane Williamson) सवयी प्रमाणे टॉसनंतर हँडशेक करायला गेले, पण त्वरित त्यांच्या चूक लक्षात आली आणि त्यांनी हात झटकले. कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) उद्रेक दरम्यान कोपर टॅपची निवड केली. दोन्ही कर्णधारांना चूक लक्षात येत हसू अनावर झाले. ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमधील मालिकेतील पहिला वनडे सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला आणि पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला.कोरोनाव्हायरसच्या भीतीमुळे सध्या हा सामना रिक्त स्टेडियममध्ये खेळला जात आहे. प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश नाही आहे. आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदा एखादा सामना प्रेक्षकांविना खेळला जात आहे. (AUS vs NZ: ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज केन रिचर्डसनची करण्यात आली कोरोनाव्हायरस टेस्ट, Cricket Australia निकालाच्या प्रतीक्षेत)

विल्यमसन आणि फिंचमधील या मजेदार घटनेचे फोटो cricket.com.au ने सोशल मीडियावर शेअर केले. क्रिकेट डॉट कॉम.आऊ यांनी ट्विट केले की, "कर्कशाच्या मधे सवयी प्रमाणे हँडशेक आणि नंतर त्वरित विनोद #AUSvNZ." कोरोनाव्हायरसच्या उद्रेकामुळे, बहुतेक लोकं हातमिळवणी टाळत आहेत आणि फिस्ट बम्प किंवा 'नमस्ते'चा पर्याय स्वीकारत आहे. पाहा ट्विट:

न्यूझीलंडविरुद्ध सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज केन रिचर्डसनला कोरोना झाल्याची बातमी समोर आली. त्याची तपासणी केली गेली असून सध्या क्रिकेट ऑस्ट्रेलिया अहवालाची प्रतीक्षा करत आहे. अहवाल नकारात्मक आल्यास तो त्वरित संघात सामील होईल. 29 वर्षीय रिचर्डसनने गुरुवारी रात्री टीम डॉक्टरांकडे घसा खवखवण्याची तक्रार केली होती. ज्यानंतर कोविड-19 च्या चाचणीसाठी त्याचा नमुना घेण्यात आला.