![](https://mrst1.latestly.com/uploads/images/2024/12/sa-vs-pak-2-.jpg?width=380&height=214)
South Africa National Cricket Team vs Pakistan National Cricket Team 1st T20 2024 Live Streaming: दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील पहिला टी-20 सामना 10 डिसेंबर रोजी म्हणजे आज खेळवला जाणार आहे. उभय संघांमधील हा सामना डर्बनमधील किंग्समीड येथे होणार आहे. दक्षिण आफ्रिकेला नुकतेच घरच्या मैदानावर टीम इंडियाविरुद्धच्या 4 सामन्यांच्या टी-20 मालिकेत 3-1 असा लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. दुसरीकडे, गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-20 मालिका 3-0 ने गमावल्यानंतर पाकिस्तान संघ येत आहे. (हे देखील वाचा: SA vs PAK 1st T20 2024 Live Streaming: आजपासून पाकिस्तान-दक्षिण आफ्रिकामध्ये खेळवली जाणार टी-20 मालिका, जाणून घ्या भारतात कुठे पाहणार थेट प्रक्षेपण)
हेनरिक क्लासेनकडे संघाचे नेतृत्व
दक्षिण आफ्रिका सध्या आयसीसी पुरुषांच्या टी-20 संघ क्रमवारीत सहाव्या स्थानावर आहे, तर पाकिस्तान सातव्या स्थानावर आहे. एडन मार्करामच्या अनुपस्थितीत, हेनरिक क्लासेनची पाकिस्तानविरुद्धच्या दक्षिण आफ्रिकेच्या टी-20 संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर दुसरीकडे मोहम्मद रिझवान पुन्हा एकदा तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत पाकिस्तानचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्ड
दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान 22 टी-20 सामने आमनेसामने आले आहेत. ज्यामध्ये पाकिस्तानने 12 सामने जिंकले आहेत. तर दक्षिण आफ्रिकेने 10 सामने जिंकले आहेत. हे माहित आहे की जेव्हा जेव्हा दोन्ही संघ एकमेकांसमोर येतात तेव्हा सामना रोमांचक होतो. सध्या पाकिस्तानचा वरचष्मा दिसत आहे.
दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील टी-20 मालिकेतील विक्रम
दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत एकूण 8 टी-20 मालिका खेळल्या गेल्या आहेत. ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा वरचष्मा दिसत आहे. दक्षिण आफ्रिकेने 8 पैकी 4 मालिका जिंकल्या आहेत. तर पाकिस्तानने 3 टी-20 मालिका जिंकल्या आहे. यावरून दक्षिण आफ्रिकेचा संघ टी-20 मध्ये बलाढ्य असल्याचे दिसून येते. मात्र, पाकिस्तानने ही मालिका जिंकल्यास दक्षिण आफ्रिकेची बरोबरी होईल.
दोन्ही संघाचे खेळाडू
दक्षिण आफ्रिका टी-20 संघ: हेनरिक क्लासेन (कर्णधार/विकेटकीपर), ओटनील बार्टमन, मॅथ्यू ब्रेट्झके (विकेटकीपर), डोनोव्हन फरेरा (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, पॅट्रिक क्रुगर, जॉर्ज लिंडे, क्वेना माफाका, डेव्हिड मिलर, एनरिक नॉर्टजे, नकाबा पीटर, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), तबरेझ शम्सी, एंडिले सिमेलेन, रासी व्हॅन डर ड्यूसेन
पाकिस्तान टी-20 संघ: मोहम्मद रिझवान (कर्णधार/विकेटकीपर), अबरार अहमद, बाबर आझम, हारिस रौफ, जहाँदाद खान, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद हसनैन, मोहम्मद इरफान खान, ओमेर बिन युसूफ, सैम अयुब, सलमान अली आगा, शाहीन आफ्रिदी, सुफियान मोकीम, तय्यब ताहिर, उस्मान खान (विकेटकीपर)