AFG A Team (Photo Credit - X)

Mens T20 Emerging Teams Asia Cup Final Live Streaming: इमर्जिंग आशिया कपचा अंतिम सामना (Mens T20 Emerging Teams Asia Cup) आज श्रीलंका आणि अफगाणिस्तान (SL A vs AFG A) यांच्यात होणार आहे. हा सामना ओमान क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध भारताला 20 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. (हे देखील वाचा: West Indies Beat Sri Lanka, 3rd ODI Match Scorecard: तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने DLS नियमानुसार श्रीलंकेचा 8 विकेटने केला पराभव, एविन लुईसची 102 धावांची शानदार खेळी)

श्रीलंकेचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास

अंतिम फेरीपर्यंतच्या श्रीलंकेच्या प्रवासाबद्दल बोलायचे झाले तर, त्याने तीनपैकी दोन साखळी सामने जिंकले होते, तर अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या साखळी सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. अफगाणिस्तानने पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा 11 धावांनी पराभव केला होता. आता श्रीलंकेकडे बदला घेण्याची सुवर्णसंधी आहे.

अफगाणिस्तानचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास

अफगाणिस्तानच्या अंतिम फेरीपर्यंतच्या प्रवासाबद्दल बोलायचे झाले तर, 3 लीग सामन्यांपैकी 2 जिंकले होते, तर हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात ते पराभूत झाले होते. उपांत्य फेरीच्या सामन्यात त्याने भारताचा विजय रथ रोखून अंतिम फेरीत धडक मारली. अफगाणिस्तानला अंतिम फेरीत एक फायदा आहे कारण त्याने श्रीलंकेचा पराभव केला आहे. तुम्हालाही इमर्जिंग आशिया कपचा हा अंतिम सामना पाहायचा असेल तर जाणून घ्या याच्याशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी.

श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना कधी खेळला जाईल? 

श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना रविवारी (27 ऑक्टोबर 2024) होणार आहे. हा सामना ओमान क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. त्याची नाणेफेक अर्धा तास आधी 06.30 वाजता होईल.

श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना कुठे पाहणार?

श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा कसोटी सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल. तसेच या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहता येईल.